सेरूला घोटाळा प्रकरणाला माजी मंत्री जबाबदार असल्‍याचा आरोप ट्रोजन डिमेलो यांनी केला

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

पणजी, 
सेरूला घोटाळा प्रकरणात पर्वरीतील राजकारणी व्‍यक्‍तींनी मोठा आवाज उठविला. मात्र, या घोटळ्याच्‍या बाबतीत या आवाज उठविणार्‍या राजकारणी व्‍यक्‍तीने महसूल मंत्री पदावर असताना कोणत्‍याच प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. आम्‍हाला मिळालेल्‍या माहितीनुसार सेरुला कोमुनिदाद घोटाळा प्रकरणात याच माजी मंत्र्यांचा हात आहे. या घोटाळा प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी रविवारी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केली. 

सेरुला भुखंडाचे एका दिवसात म्युटेशन करण्याचा प्रकार एका मृत व्यक्तीच्या नावाने करण्यात आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नियुक्त करण्‍याची गरज आहे. या घोट्याळ्याचे स्‍वरूप मोठे असल्‍याची वाच्‍यता माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीही केली होती. माजी मंत्र्यांनी या घोटाळ्यातील तपासात सक्रियपणे भाग न घेता घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची पाठराखण केली, असा आरोपही त्यांनी केला. 
सेरूला घोटाळा प्रकरणासंदर्भात ज्यावेळी विधानसभेत विरोधी पक्षाने आवाज उठविला तेव्हा तत्कालीन महसूल मंत्र्यांनी या प्रकरणात तपास करण्याचे आश्‍वासन विधानसभेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीच केले नाही. 
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ज्यावेळी म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात छापा टाकला त्यावेळी पोलिसांच्या हाती महत्वाची कागदपत्रे लागली होती. मात्र नंतरही हे प्रकरण दाबण्‍याचे काम याच मंत्र्‍यांनी केले असल्‍याचेही डिमेलो म्‍हणाले.   

संबंधित बातम्या