फलोत्पादन महामंडळाकडून ग्राहकाला कांदा खरेदीत दिलासा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

आता महामंडळाकडील कांद्याचे दर ३७ रुपयांवर आले असून, ग्राहकांना एक प्रकारे अजूनही महामंडळच दिलासा देत असल्याचे दिसते.

पणजी: महापालिकेच्या मार्केट इमारतीतील खुल्या बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडे कांद्याचे दर अद्याप ६० रुपयांवर स्थिर आहेत. परंतु फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रावर विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर हे ग्राहकांना दिलासा देणारे आहेत. सध्या महामंडळाच्या केंद्रावर ३७ रुपये किलोने कांदा विक्री होत आहे.

खुल्या भाजीपाला विक्रेत्यांकडे गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याचे दर ६० रुपयेच आहेत. त्याखाली कांद्याचे दर येत नाहीत, घाऊक बाजारात कांदा ४६ रुपये किलोने मिळत असून, तो कांदा घेऊन हे विक्रेते ६० रुपये किलोने विकत आहेत, तर दुसरीकडे मात्र फलोत्पादन महामंडळाने मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याचे दर परवडणारे नसतानाही ग्राहकांना १०० रुपयांच्या खाली दर ठेवून कांदा विकला होता.

महामंडळाकडे सरसकट गोणीतील कांदा निवडून घ्यावा लागतो, तेवढाच काय तो फरक.त्यामुळे कांदा घेणारा ग्राहक फलोत्पादन महामंडळाकडे सकाळी लवकर येतो, कारण कांद्याच्या गोणी ओतल्यानंतर त्यातून चांगला कांदा निवडण्यास वेळ मिळतो, असे केंद्रावरील काही ग्राहकांनी सांगितले.महामंडळाकडे सध्या कांद्याची आवकही पूरक होत आहे.महामंडळाला घाऊक आणि आवश्‍यक त्या दराने बाह्य बाजारपेठेतून कांदा मिळू लागल्याने राज्यातील त्यांच्याकडील दरही कमी होत आहेत.त्यामुळे सध्या हे दर ग्राहकांना दिलासादायक आहेत.

 

 

 

 

प्लास्टिकमधून इंधन निर्मिती कंपनीची कानउघाडणी

संबंधित बातम्या