दाबोळी येथे मद्यविक्री परवाना देण्यास विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:दाबोळी येथील विमानतळावर किरकोळ मद्यविक्री विरोध
दाबोळी विमानतळ येथील आस्थापनामध्ये सीलबंद मद्याच्या बाटल्यांची किरकोळ विक्री करण्यासाठी परवाना देण्यास गोवा मद्य व्यापारी संघटनेने विरोध केला आहे.यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.हा परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती या संघटनेने दिली.

अबकारी खात्याकडून दाबोळी विमानतळावर असलेल्या आस्थापनांना परवाना देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.हे परवाने दिल्यास त्याचा थेट परिणाम २ हजार कुटुंबांवर होणार आहे.दिल्ली येथील एका कंपनीने गोव्यातील स्थानिक व्यक्तीच्या नावाने अबकारी खात्याकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे.गोव्यात २५ वर्षे वास्तव्य असलेल्यांनाच मद्यविक्रीचा परवाना मिळू शकतो त्यामुळे या कंपनीने गोमंतकियाची मदत घेतली असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्‍यमंत्र्यांनी फाईल मागविल्‍या

संबंधित बातम्या