जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनी एकत्रित यावे:सरदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:भाजपविरोधी मते फुटू नयेत याची काळजी घ्यावी
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर झाल्यानंतर या निवडणुकांना सामोरे जायचे की नाही, याचा विचार आम्ही उद्या, बैठकीत घेऊ.मात्र, निवडणूक लढवायची झाल्यास भाजपविरोधी मतांचे विघटन होऊ नये, याची काळजी घेऊन या निडणुकांत विरोधकांनी एकत्रित यावे, अशी आपली इच्छा असल्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मेरशी येथील चौकात एका कार्यक्रमासाठी आलेल्या सरदेसाई यांनी सांगितले, की जिल्हा पंचायत निवडणुका महत्त्वाच्या आहेत.सत्ताधारी पक्षाला विरोधक क्षीण झाल्याचे वाटत आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत, त्या निवडणुका जर लढवायच्या झाल्यास विरोधकांनी एकत्रित यावे. विरोधकांमध्ये फूट असू नये, असे आपणास वाटते.विरोधकांमध्ये जर फूट असेल, तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होतो.आम्ही विधानसभेच्यावेळी आवश्‍यक त्याच ठिकाणी उमेदवार दिले.गेल्या पाच वर्षांपूर्वी जिल्हापंचायत निवडणुका लढविण्याचे काँग्रेसने टाळले होते. त्यामुळे यावेळी त्यांचा त्याप्रकारे त्या निडणुकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आत्ता आहे का, हाही प्रश्‍न आहे.
ते पुढे म्हणाले की, आपण आपल्या भाजपविरोधी मतांचे विघटन होऊ नये, या मतावर ठाम आहे.म्हादईच्या विषयावर जर एकत्र येत असतील, तर काँग्रेसनेही एका छताखाली यावे.विरोधक सर्वत्र एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्‍न विचारला असता सरदेसाई म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते, अशी टिप्पणी त्यांनी केली. आपण गोंयकारवादी आघाडीचे नेतृत्व करू शकतो. जे लोक महाराष्ट्रात विलिनीकरणासाठी आघाडीवर होते, तेच लोक सध्याच्या राजकारणात आहेत, असेही त्यांनी नमूद करीत भाजप सरकारवर टीका केली.

भाजप सरकारवर टीका

संबंधित बातम्या