ओरिसातील युवकाची आगोंद येथे आत्महत्या

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

एका इमारत बांधकाम स्थळी, ठेकेदार प्रदीप सागरेकर यांचे चौघे कामगार रहात होते. यामध्ये ओरिसा येथील माधव गोपाळ (२०), कामगाराचा समावेश होता.

आगोंद

ओरिसातील एका वीसवर्षीय युवकाकडून एका झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना २९ रोजी सकाळी आगोंद, देसाईवाडा येथे घडली. काणकोण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करता मडगाव इस्पितळात पाठवून दिला आहे. पोलिस सहाय्यक निरिक्षक राजेश देसाई अधिक तपास करीत आहेत. देसाईवाडा येथे सुरू असलेल्या एका इमारत बांधकाम स्थळी, ठेकेदार प्रदीप सागरेकर यांचे चौघे कामगार रहात होते. यामध्ये ओरिसा येथील माधव गोपाळ (२०), कामगाराचा समावेश होता. लॉकडाऊनमुळे कामगार अडकून पडल्याने घरी फोनवर बोलणे सुरू होते. 'मोरअजे' या ठिकाणच्या एका झाडाला लटकत असलेला माधव याचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर कामगारांचे ठेकेदार सागरेकर यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवून दिला. उत्तरीय तपासणी अंती मडगाव इस्पितळात मृतदेह राखून ठेवला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

 

 

संबंधित बातम्या