माओवाद्यांशी संबंध असल्‍याप्रकरणी उस्मानिया विद्यापीठ प्राध्‍यापकाला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

तेलंगना:विद्यार्थ्यांकडून निदर्शने : पोलिसांच्‍या कृतीबाबत न्‍यायालयाकडूनही संशय
उस्मानिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चिंतीकिंडी कासिम यांना तेलंगना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करून अटक केली.त्‍यानंतर काही तासानंतर उच्च न्यायालयाने त्यांना रविवारी वाजता सरन्यायाधीशांसमोर हजर करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.दुसरीकडे मुख्य न्यायमूर्ती आर.एस. चौहान यांच्या घराजवळ सिव्हील लिबर्टीज असोसिएशनने कासिम यांच्या अटकेविरूद्ध निदर्शने केली.

कासिम हे नियमितपणे विद्यापीठात जाऊन वर्ग घेत होते. त्‍यामुळे ते फरारी होते असे पोलिस कसे म्हणू शकतात? याबाबत सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले.अटकेसाठी त्यांनी पोलिसांनी उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरूंकडून परवानगी घेतली आहे का? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.रविवारी गाजवेल येथील न्यायालयासमोर कासिमला हजर केल्‍याची माहिती पोलिसांना दिली.
उस्मानिया विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टरमधील कासिम यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची पुस्तके, संगणक, हार्ड डिस्क व मोबाइल फोन जप्त केला. डॉ. कासिम यांची नुकतीच विरासम येथील ‘रेव्हल्‍युशनरी रायटर्स असोसिएशन’च्या सचिवपदी निवड झाली आहे. ते ‘नाडूथुन्ना तेलंगाना’ (समकालीन तेलंगणा) या तेलगू वृत्तपत्राचे संपादकही आहेत.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकाची पत्नी स्नेहलता यांनी पोलिसांवर घरात घुसखोरी आणि साहित्‍याची मोडतोड केल्‍याचा आरोप केला.पोलिसांनी झडती घेत संपूर्ण घराची तोडफोड केल्याचे त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. स्नेहलता यांनी आपले पती तेलंगणातील बेरोजगारी, भेदभाव आणि इतर सामाजिक प्रश्नांविरोधात आवाज उठवत असल्‍यामुळे तेलंगना सरकारने हे कृत्‍य केल्‍याचा आरोप केला.त्‍यामुळे नाहक त्रास देण्‍याचे बंद करून आपल्या पतीला सोडून द्यावे, असे आवाहन केले.

तोतया मंत्र्यांला जामीन होऊनही हमीदाराअभावी कोठडीतच

विद्यार्थ्यांकडून मोर्चा
कासिम त्यांच्या अटकेबद्दल कळताच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवत मोर्चा काढला.त्‍यामुळे कॅम्पस परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी घटनास्‍थळी पोहोचून परिस्‍थितीवर नियंत्रण मिळविले.याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना अटक केली आहे.त्यांच्या विरुद्ध २०१६ मुलुगु पोलिस स्टेशनमध्ये बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.तेलंगना पोलिसांनी ऑक्टोबरपासून १७ जणांना सीपीआय (माओवादी) पक्षाशी संबंध असल्याचा संशयावरून अटक केली आहे.दडपणाविरूद्ध फोरम - तेलंगणा आणि राज्य नागरी स्वातंत्र्य समितीने या अटकेचा निषेध केला आणि कासीम व इतरांना त्वरित मुक्त करण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या