ओशेलबाग - धारगळच्या अपघातात कदंबचालक ठार

Dainik Gomantak
बुधवार, 15 जानेवारी 2020

ट्रकने दुचाकीस्‍वाराला दिलेल्‍या धडकेत मधलावाडा - विर्नोडा येथील ज्ञानेश्वर विठ्ठल नाईक (५५ वर्षे) हे जागीच ठार झाले. ज्ञानेश्‍‍वर हे कदंब महामंडळात चालक म्हणून नोकरीला होते.

प्रकाश तळवणेकर 

पेडणे

विर्नोडा व धारगळ - ओशेलबाग सीमेजवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ट्रकने दुचाकीस्‍वाराला दिलेल्‍या धडकेत मधलावाडा - विर्नोडा येथील ज्ञानेश्वर विठ्ठल नाईक (५५ वर्षे) हे जागीच ठार झाले. ज्ञानेश्‍‍वर हे कदंब महामंडळात चालक म्हणून नोकरीला होते. चारपदरी महामार्गाच्‍या सदोष बांधकामामुळे अपघात झाला. यामुळे संतप्त लोकांनी सुमारे दोन तास वाहतूक रोखून धरली. बेजबाबदार कंत्राटदारावर कारवाई करावी, उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची वस्‍तुस्‍थिती पाहावी, पळून गेलेल्या ट्रक चालकाला त्‍वरित अटक करावी, अशी आंदोलनकर्त्यांच्‍या मागण्‍या होत्‍या.
याबाबतचे वृत्त असे की, मधलोवाडो - विर्नोडा येथील ज्ञानेश्वर नाईक हे सायंकाळी दुकानावरून सामान खरेदीसाठी जीए ११ सी ०६६४ या क्रमांकाच्या दुचाकीने घरी येत असताना एका ट्र्कने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, त्‍यात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले.
अपघाताची माहिती मिळाल्यावर पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर,उपनिरीक्षक विवेक हळर्णकर हे घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला व मृतदेह गोवा वैद्यकीय इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला.कंत्राटदार चुकीच्या पध्दतीने व बेजाबदारपणे कक्म करत असल्याचा लोकांनी आरोप करुन मार्गावरील वाहतुक बंद पाडली. वातावरण तंग होत असल्याची माहीती मिळाल्यावर म्हापसा येथील उप अधीक्षक गजानन प्रभुदेसाइ ,निरीक्षक तुषार लोटलीकर तसेच पेडणे व म्हापसा येथील पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झालीउप अधीक्षक श्री प्रभुदेसाई,निरीक्षक संदेश चोडणकर व यांनी जमावाची समजूत काढल्यावर मार्ग वाहतुकीसाठी खुला केला
कंञाटदाराच्या बेजाबदारपणामुळे राष्ट्रीय महामार्ग जातात बळी. सरकार उदासिन असून कुठल्याही प्रकारची खबरदारी कंञाटदार घेत नसून कंञाटदाराच्यावरा सरकारचे वचक नसल्याने रस्त्याचे काम करताना कोणत्याही उपाययोजना करत नाहीतएका बाजूने खोदकाम करताना दुसऱ्या बाजूने वाहतूकीसाठी चांगली सोय करत नाहीत.यामुळे रोज असे अपघात होऊन बळी जात आहेत अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया यावेळी ऐकु येत होत्या.

संबंधित बातम्या