पालघर हत्याप्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

गडचिंचले गावात साधू आणि चालकाच्या हत्याप्रकरणात कासा पोलिसांनी 110 आरोपींना अटक केली होती. पैकी 9 अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे; तर उर्वरित आरोपींपैकी 22 आरोपींना वाडा पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

डहाणू/ वाडा

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील तिहेरी हत्याप्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाबाधित आरोपी ???? वर्षीय असून तो वाकीपाडा येथील रहिवासी आहे. त्यामुळे गडचिंचले गावातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या आरोपींसह पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. संपर्कातील आरोपींना न्यायालयाच्या परवानगीने क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या रुग्णाला वैद्यकीय उपचाराकरिता पालघरमधील ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत याचा शोध प्रशासन घेत आहे.
गडचिंचले गावात साधू आणि चालकाच्या हत्याप्रकरणात कासा पोलिसांनी 110 आरोपींना अटक केली होती. पैकी 9 अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे; तर उर्वरित आरोपींपैकी 22 आरोपींना वाडा पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी अहवालातून पुढे आले आहे.

न्यायालयाच्या परवानगीने क्वारंटाईन
कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत; मात्र खबरदारी म्हणून त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या आरोपींसह पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. संपर्कातील आरोपींना न्यायालयाच्या परवानगीने क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

वाडा शहर सील
वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे 7 मेपर्यंत वाडा शहर सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

 

संबंधित बातम्या