पणजी कलेक्टरने दिली कार्निवल मिरवणुकीस परवानगी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी पणजीतील मिरणुकीला दिली परवानगी
कार्निव्हल समितीबरोबर झाली बैठक: महापालिकेसमोरील अडचण दूर

पणजी : पणजीतील कार्निव्हलच्या शनिवारी निघणाऱ्या मिरवणुकीपुढील परवानगीची अडचण दूर झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मिवरणुकीला परवानगी दिली आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी आर. मनेका, आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कार्निव्हल समितीचे सदस्य उपस्थित होते.

तीन दिवसांवर कार्निव्हल मिरवणूक आली, तरी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी अद्याप दिली नव्हती. परंतु महापालिका ठरलेल्या जागेवरच म्हणजे पूर्वीच्या भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरच मिरवणूक काढण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. तसेच महापालिकेने या मिरवणुकीची तयारीही सुरू केली होती. परवानगी न मिळाल्याने बुधवारी हा विषय चर्चेचा बनला होता. ज्या पद्धतीने कला अकादमी परिसरात लोकोत्सवाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आणि महापालिकेने परवानगी दिली नसतानाही तो उत्सव पार पडला. त्यावरून कार्निव्हलची मिरवणुकही पार पडणार हे निश्‍चित मानले जात होते.

मिरवणूक एकच दिवस असल्याने त्याला विरोध करण्याची काहीच गरज नसल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. जुन्या मार्गावर कार्निव्हल मिरवणूक का आवश्‍यक आहे, हे आमदार मोन्सेरात यांनी पटवून दिले. त्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यालयात आमदार मोन्सेरात यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या.

 

 

मडगाव कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक मार्ग प्रकरण

संबंधित बातम्या