महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पाला निधीची साशंकता..!

Dainik Gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020

महापालिका गॅरेज, सिने नॅशनल थिएटर, मळा लेक, ॲनिमल वेल्फेअर सोसायटी सांतिनेज, करंजाळे मासळी मार्केट, पाटो येथील प्रस्तावित वाहतूक भवन, आंतरराज्य बस टर्मिनस, सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज आल्थिनो, पोलिस हेडक्वॉर्टर, गोवा राखीव पोलिस मुख्यालय, कांपाल कवायत मैदान आणि रोझ गार्डन एमजी रोड याठिकाणी बायोडिजास्टर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे.

पणजी,

महापालिका आपल्या कार्यक्षेत्रात बारा ठिकाणी बायो मेथेनेशन प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागाही निश्‍चित केल्या आहेत. परंतु कोरोनामुळे देशापुढे आर्थिक संकट असताना १४ व्या वित्त आयोगातर्फे या प्रकल्पांसाठी मिळणारा निधी खरोखरच मिळणार का, याबाबत साशंकता आहे.
पणजी महापालिकेने आपल्या क्षेत्रात बायो मेथेनेशन प्रकल्प उभारण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे. त्यानुसार महापालिकेने बारा ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यासाठी निश्‍चित केली असून, त्यातून प्रत्येक दिवसाला पाच टन पालापाचोळा अशा कचऱ्यावर प्रक्रिया करता येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या सोसायटीला देण्यावर महापालिकेचा विचार सुरू आहे. १४ व्या वित्त आयोगाने जरी या प्रकल्पाला लागणाऱ्या निधीला मंजुरी दिली असली तरी तो निधी खरोखरच येईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
कोरोनामुळे सध्या देशच नव्हेतर सर्व राज्ये आर्थिक खर्चावर निर्बंध आणण्यासाठी आखणी करीत आहेत. त्यातच महापालिका हे प्रकल्प राबवू इच्छित आहे, त्यासाठी २.९ लाखांचा निधी वित्त आयोग देईल, तेव्हाच या प्रकल्प पुढे सरकू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात महापालिका गॅरेज, सिने नॅशनल थिएटर, मळा लेक, ॲनिमल वेल्फेअर सोसायटी सांतिनेज, करंजाळे मासळी मार्केट, पाटो येथील प्रस्तावित वाहतूक भवन, आंतरराज्य बस टर्मिनस, सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज आल्थिनो, पोलिस हेडक्वॉर्टर, गोवा राखीव पोलिस मुख्यालय, कांपाल कवायत मैदान आणि रोझ गार्डन एमजी रोड याठिकाणी बायोडिजास्टर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या