अल्पवयीन चालकांच्या अपघातांना पालकच जबाबदार!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी : राज्यात वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहन चालकांवर करडी नजर व कारवाई होत असताना काहीपालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातात अल्पवयीन मुलांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

यावर्षी गेल्या सव्वादोन महिन्यांत राज्यामध्ये १०३ अल्पवयीनांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या अल्पवयीन मुलांबरोबरच वाहनाच्या मालकावरही दंडात्मक कारवाई केली गेली असल्याची वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पणजी : राज्यात वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहन चालकांवर करडी नजर व कारवाई होत असताना काहीपालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातात अल्पवयीन मुलांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

यावर्षी गेल्या सव्वादोन महिन्यांत राज्यामध्ये १०३ अल्पवयीनांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या अल्पवयीन मुलांबरोबरच वाहनाच्या मालकावरही दंडात्मक कारवाई केली गेली असल्याची वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हल्लीच दोन दिवसांत चार अल्पवयीन शालेय मुलांचा दोन वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुले १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालक परवान्यासाठी अर्ज करता येत नाही, त्यामुळे ते वाहन चालवू शकत नाहीत. अनेकवेळा राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच बिगर सरकारी संस्थांतर्फे रस्ता अपघात तसेच रस्ता सुरक्षा यासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

काही शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये मोटार वाहन कायद्यातील नियम याची माहिती वाहतूक पोलिस विशेष कार्यक्रमाद्वारे जनजागृती करत असले तरी अजूनही अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन रस्त्यावर चालविताना दिसतात. महाविद्यालयात दुचाकी वाहने घेऊन येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांची संख्या वाहतूक पोलिस अचनाक त्या ठिकाणी करत असलेल्या तपासणीमुळे काही प्रमाणामध्ये कमतरता झाली आहे अशी माहिती पणजी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे दंडात्‍मक तरतूद?

जी अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून येतात त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम ३ व ४ खाली कारवाई करताना ४५० रुपये दंड दिला जातो तर वाहनाचा मालकाला कलम १८० खाली ५०० रुपये दंड दिला जातो. तसेच वाहनाच्या ॲक्रोबेटीक कवायती किंवा भरधाव वेगाने वाहन चालवून शर्यती लावणाऱ्या चालकांना कलम १८४ खाली ६०० रुपये दंड दिला जातो. कायद्यात नव्या दुरुस्ती नियमांनुसार ही दंडात्मक रक्कम सरासरी दहा पटीने आहे. या दुरुस्तीची अंमलबजावणी झाल्यास त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण येऊ शकते.

वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची खूपच कमी आहे. वाहतूक व्यवस्था, महनीय व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी तसेच विविध महोत्सवांचे आगमन यासाठी वाहतूक पोलिस वापरले जात असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे, असे मत वाहतूक अधिकाऱ्याने व्यक्त केले.

राज्यात ज्या ठिकाणी सरळ रस्ते आहेत त्या ठिकाणी काही दुचाकीचालक ॲक्रोबेटीक कवायती करतात तसेच शर्यती लावतात. या शर्यतीमुळे त्याचा त्रास रस्त्यांवरून वाहन चालविणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. मिरामार, वेर्णा या रस्त्यांवर सर्रास या वाहनांच्या शर्यती रात्रीच्यावेळी चालकांमध्ये लागतात. वाहतूक पोलिस रात्री उशिरा रस्त्यांवर नसतात त्याचा गैरफायदा हे चालक घेतात. हल्लीच वेर्णा येथे झालेला कारचा अपघात हा बेभानपणे चालवून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यानेच या तिघांचा मृत्यू झाला. वाहतूक पोलिसांकडे वाहनांची गती मोजणारी यंत्रे (स्पिडोमीटर) कमी असल्याने आळटून पालटून ती प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावर गती दर्शविणारे फलक असूनही त्याचे पालन कोणीच करत नाही व पोलिसही रस्त्यावर ती गती मोजण्यास हजर नसल्याने वाहन चालक भरधाव वेगाने वाहने हाकतात.

गेल्यावर्षी अपघात मृत्यूमध्ये वाढ

राज्यातील रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यास वाहतूक व पोलिस खाते अपयशी ठरले आहे. राज्यामध्ये २०१८ साली नोंद झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २०१९ मध्ये १५ टक्क्यांनी वाढल्याने पोलिस खात्याच्या प्रमुखांनी वाहतूक पोलिस विभाग वार्षिक अहवाल आपल्याकडे ठेवून घेतल्यास दोन महिने उलटले तरी तो उघड केलेला नाही. रस्ता अपघातांवरील नियंत्रणापेक्षा हे अधिकारी वाहतूक पोलिस विभागावर दोष येईल याबाबत चिंतेत आहेत.

 

संबंधित बातम्या