पासबुकची तपासणी आवश्‍यक

दिलीप सहकारी
रविवार, 1 मार्च 2020

मागील आठवड्यांत माझे स्नेही श्री अरुण गोडसे ह्यांच्या खात्यातील मासिक 750 रुपयाचे डेबिट पास बुक वर दाखवण्यात आले. परंतु हे पैसे कुणाला जातात हा प्रश्‍न त्यांना पडला. ह्या करता बॅंक मॅनेजरला भेटून ट्रान्स्फर झालेल्या खात्याची माहिती काढणे आवश्‍यक आहे. ते पैसे खरेचं संबंधित व्यक्तीला मिळतात काय ह्याची खातरजमा करणे आवश्‍यक आहे. काही वेळा आपण क्रेडीट कार्ड वर काही वस्तू खरेदी करतो. त्याखाली पैसे भरताना पे बाय इ एम्‌ आय्‌ असा बटण असतो.

तंत्रकौशल्य : तो बटण दाबल्यास आपण खर्च केलेल्या रकमेची परतफेड आपल्याला इ एम आय द्वारे किंवा मासिक हप्त्यांनी करता येते. त्यावर वार्षिक 12 ते 15 टक्के व्याजही आकारले जाते. ह्या मुळ मुद्दलावर व्याजाची रक्कम मिळवून झालेल्या रकमेला 36 महिन्यांनी भागतात. मग प्रत्येक महिन्याला आपण खात्यांतून तेवढी रक्कम वजा होत जाते. 36 महिन्यानंतर आपला इ एम आय संपतो. मध्यंतरी आणखी एखादी वस्तूची खरेदी करुन पुन्हा इ एम्‌ आय बटण दाबल्यास दुसऱ्या खरेदीवर आणखी एक हप्ता सुरु होतो. त्यामुळे इ एम आयच्या रकमेत आणखी वाढ होते.

त्यामुळे आपल्या खात्यांतील रक्कम वजा होत असल्यास त्याबाबत जागरुक राहून संपूर्ण रकमेची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. हल्लीच रेनो गाडीच्या एजंटची एक जाहीरात वाचण्यात आली. एचडी एफ्‌सी बॅंकेकडून कर्ज घेतल्यास आरटी ओ टॅक्‍स्‌ वर 50 टक्के अशा अर्थाची ती जाहीरात होतो. 50 टक्के सुट असे लिहिले नव्हते. परंतु तोंडी सांगण्यात आले. त्यानंतर बारीक चौकशी केल्यानंतर असे ध्यानांत आले की गाडी घेताना संपूर्ण रोड टॅक्‍स भरण्याची जरुरी नाही. 50 टक्के रोड टॅक्‍स घेऊन गाडी ताब्यात घेता येते. उरलेला 50 टक्के रोड टॅक्‍स एचडीएफसी बॅंक कर्जाच्या रुपाने देते व हप्तेबंदीच्या स्वरुपात ती रक्कम पुन्हा वसूल करते. काही शब्द लपवून अशा जाहीरातीना बळी पडलेल्यांची संख्या भरपूर आहे. प्रतिष्ठित व्यापारी तसेच व्यवसायिक 30 - 40 हजारांच्या रोड टॅक्‍सवर 60 महिन्यांच्या कालावधी करता 5 - 7 शे रुपये वाढीव इ एम आय द्यायला मुळीच आदेवेदे घेणार नाहीत. किंबहूना त्यांच्या ते लक्षात सुद्धा येणार नाही.

आज रोड टॅक्‍सवर 50 टक्के सुट आहे. ह्या खुशीने तो सरळ कर्ज काढून गाडी घेऊन घरी जाईल. नकळत 700 रुपये च्या वाढीव इ एम आय भरुन 3 वर्षांनंतर कदाचित गाडी विकून पण टाकेल. मग नवीन खरीददार विशेष हिशोब न करता संपूर्ण कर्जाची रक्कम भरुन गाडी आपल्या नावावर करुन टाकेल. त्यामुळे ह्या वाढीव इ एम आय चा फटका कदाचित नवीन खरेदीदाराला सुद्धा बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आपण कर्ज घेत असल्यास त्याचा इ एम आय व्याजदर व परतफेडी ची मुदत तसेच मुदतपूर्व परतफेडीवर लागणारा दंड ह्याचा जरुर विचार करावा. एमेझॉन विमान तिकिटीच्या खरेदीवर हल्लीच कंपनीने 500 ते 2500 रुपये पर्यंत सुट जाहीर केली आहे. आपण ज्या रकमेच्या विमानाच्या तिकिटची खरेदी करता, त्या प्रमाणात ही सुट वाढत जाते.
5000 रुपये ते 30000 रुपये एवढ्या रकमेच्या विमानाची तिकिटे काढल्यास ही सुट एमेझॉन पे ह्या वॉलेट मधे घातली जाते.

ही रक्कम आपल्याला एमेझॉन वर पुढल्या खरेदी साठी वापरावी लागते. ती आपल्या बॅंकेत जमा करता येत नाही. तिकिट खरेदी केल्यानंतर आपण खर्च केलेले पैसे विमान कंपनीला ट्रान्स्फर केले जातात. बोनसची रक्कम आपल्या खात्यांत जमा केली जाते. एमेझॉन प्राइम ह्या योजनेखाली आणखी वाढीव 999 रुपये भरल्यास सुट किंवा कॅश बॅंकच्या रकमेत आणखी 500 रुपयेंनी वाढ होते. तसेच एमेझॉन प्राइम ह्या एप वर एका वर्षाकरता मोफत टेलीव्हीजन व नवीन सिनेमा पहाण्याची सोय ही आपल्याला मिळते. एमझॉन वर काही वस्तूंची खरेदी केल्यास त्या करता डेलीव्हरी चार्जेस माफ केले जातात. वारंवार एमेझॉन वर खरेदी करणाऱ्या लोकांनी एमेझॉन प्राइमची मेम्बरशीप घेऊन वाढीव कॅशबॅक घ्यायला काही हरकत नाही. शिवाय वीज बील, मोबाइल रीचार्ज, डीटीएफ रीचार्ज ह्या वर 5 ते 10 टक्के कॅशबॅक नेहमीच मिळत असतात. अशा तऱ्हेच्या खरेदी करता दुकानांत जाण्यापेक्षा घरबसल्या एप चा वापर करुन काही प्रमाणात कॅश बॅक जरुर पदरात पाडून घ्यावी.

गुगलपे वर बक्षीस मिळण्याची चांगली संधी 
गुुगल पे हे गुगल चे एप दिवसेंदिवस चांगलेच लोकप्रिय होत आहे. प्ले स्टोअर वरुन मोफत डाऊनलोड करुन व आपला मोबाइल नंबर घालून रजिस्टर केल्यानंतर आपल्याला गुगलपे वरुन दुसऱ्या व्यक्तीला आपण पैसे ट्रान्स्फर करु शकतो. आपले खाते लोक करताना आपल्याला बॅंकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक, वॅली डीटी व 4 अंकी गुप्त कोड हे सर्व एण्टर करावे लागते. त्यानंतर आपले खाते गुगल पेला लींक केले जाते. गुगल पे वरुन पैसे देताना काळजीपूर्वक त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर व नाव तपासून घ्यावे. चुकून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवल्यास ते परत मिळण्याची शक्‍यता अतिशय धुसर असते. कित्येक वेळा ओ एल एवस वर एखाद्या वस्तूची विक्री करण्यासाठी जाहीरात दिल्यास, आपल्यानंतर फोन करुन गुगल पे वर पैसे पाठवतो असे सांगितले जाते. त्यानंतर त्या माणसाचा आपल्याला पैसे पाठवले आहेत असा फोन येतो.

मात्र पैसे पाठवण्याऐवजी ती रात्री व्यक्ती आपल्या खात्यांतील पैसे घे ह्या बटणाचा उपयोग करण्यास भाग पाडले. अशा वेळी रीसीव्ह याच बटणाचा वापर करावा व रीसीव्ह करताना आपल्याला चार आंकडी गुप्त कोड एण्टर करावा लागत नाही हे हो ध्यानात ठेवावे. गुगल पे वरुन आपण 75 किंवा त्याहून जास्ती रीचार्ज केल्यास त्यासाठी खात्रीचे बक्षीस दिले जाते. त्या शिवाय 150 ते 500 रुपय पर्यंत दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवल्यास स्क्रॅच कार्ड दिले जाते. ह्या स्क्रॅच कार्ड द्वारे 5 ते 100 रुपये पर्यंत बक्षीस मिळू शकते हे पैसे सरळ आपल्या बॅंकेत जमा होतात. गुगल पे कडे स्वत:चे वॉलेट नाही. आठवड्याला एकदा, प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10 वाजता मागील आठवड्यांत 500 किंवा त्याहून जास्ती पैसे दुसऱ्या व्यक्तीला पाठवल्यास 100, 000 रु. पर्यंत बक्षीस मिळण्याची संधी स्क्रॅच कार्ड द्वारा मिळू शकते. शिवाय वीज बिल, सिनेमा तिकिट, विमान तिकिट ह्या साठी गुगलपे वापरल्यास मासिक 100 ते 200 रु. ची कमाई घरबसल्या करता येते.
पान 6

संबंधित बातम्या