पर्वरी मार्केट संकुल १५ मार्चपर्यंत पूर्ण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पर्वरी मार्केट संकुल १५ मार्चपर्यंत
गृहनिर्माणमंत्री माविन गुदिन्हो यांचे आश्‍वासन

सहा महिने झाले या मार्केटमध्ये अनेक समस्यांना विक्रेत्यांना सामोरे जावे लागत आहे.या विक्रेत्यांना तेथून स्थलांतर करून इतर ठिकाणी सामावून घेण्‍यात यावे.

पणजी: पर्वरीतील नव्या मार्केट संकुलाचे काम हाऊसिंग मंडळाला दिले आहे. विक्रेत्यांचे स्थलांतर करणे कठीण आहे. मंडळाच्या अध्यक्षांना यासंदर्भात कल्पना दिली आहे व स्थानिक आमदारांची त्यासाठी मदत घेतली जाईल. येत्या १५ मार्चपर्यंत मार्केट संकुलाचे काम पूर्ण करून या विक्रेत्यांचे स्थलांतर केले जाईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण मंडळ खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले. मात्र, निश्‍चित तारीख देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्वरीतील जुन्या हाउसिंग बोर्डमधील मार्केट धोकादायक बनले आहे. त्यामुळे तेथील विक्रेत्यांचे स्थलांतर केले जावे. ते मोडकळीस आल्याने त्याची डागडुजी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.मात्र, कोणतीच कार्यवाही झालेली नाही.स्थानिक आमदार म्हणून सर्व ते सहकार्य करण्याची तयारी आहे.या मार्केट संकुलाचे काम कधी पूर्ण होईल त्याची निश्‍चित तारीख द्या, अशी मागणी आमदार रोहन खंवटे यांनी शून्य तासावेळी केली होती.

दरम्यान, पर्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थितीही खूपच नाजूक व धोकादायक आहे. त्या केंद्राच्या छप्पराच्या सिलिंगचे तुकडे खाली पडतात. त्याचे व्यवस्थित वॉटरप्रुफिंग झालेले नाही.हे केंद्र पाच वर्षांपूर्वी सुरू झाल्याने या भागातील लोकांना सोयीस्कर झाले आहे तसेच औषधेही मिळतात.वृद्ध तसेच लहान मुले या केंद्रात उपचारासाठी येतात. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी ही समस्या सोडवून हे केंद्र रुग्णांसाठी सुरक्षित करावे, अशी मागणी आमदार रोहन खंवटे यांनी शून्य तासावेळी केली.आरोग्यमंत्री सभागृहात यावेळी उपस्थित नसल्याने आमदार खंवटे यांना कोणतेच आश्‍वासन मिळू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिले नाही.

 

 

 

भूजलसाठ्यांवर ‘जीआयएस’द्वारे देखरेख

 

संबंधित बातम्या