पे अँड पार्किंग चे पास

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पार्किंगसाठी कंत्राटदारांकडून
वाहनधारकांसाठी पासची सोय

पणजी : पणजी शहरात शनिवारपासून १८ जून आणि आत्माराम बोरकर मार्गासह काही ठिकाणांवर पे-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. आता संबंधित कंत्राटदाराने पे-पार्किंगसाठी मासिक व वार्षिक पासची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी वाहनधारकांना सवलतही दिली गेली आहे.

पणजी शहरातील पे-पार्किंगचे कंत्राट जुवारकर असोसिएट्स कंपनीने घेतले आहे. तीन वर्षांसाठी असलेल्या या कंत्राटापोटी १.६२ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. कंत्राट घ्यावे की नको, अशा द्विधास्थिती असताना आपले नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ नये यासाठी या कंपनीने हे कंत्राट घेतले आणि शनिवारपासून पे-पार्किंगला सुरवात झाली.

शहरात ज्या ठिकाणी पे-पार्किंग आहे, त्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी महापालिकेने दर ठरविले असून नगरविकास खात्याने ते अधिसूचित केले आहेत.

 

 

 

 

 

कुंकळ्ळीत होणार दिमाखदार शिवजयंती सोहळा

 

 

 

संबंधित बातम्या