पणजीत १५ फेब्रुवारीपासून ‘पे पार्किंग’

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पणजी:  पणजी महानगरपालिकेकडून ‘पे पार्किंग’ १५ फेब्रुवारी पासून सुरु केले जाईल. चारचाकी वाहनांबरोबरच दुचाकी वाहनांसाठी ‘पे पार्किंग’ लागू होईल. २४ तास ‘पे पार्किंग’ असेल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

पणजी:  पणजी महानगरपालिकेकडून ‘पे पार्किंग’ १५ फेब्रुवारी पासून सुरु केले जाईल. चारचाकी वाहनांबरोबरच दुचाकी वाहनांसाठी ‘पे पार्किंग’ लागू होईल. २४ तास ‘पे पार्किंग’ असेल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

पे पार्किंगसाठी झुवारकर असोसिएट्स यांना कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी ९६ लाख रुपये बँक हमी घेण्यात आली आहे. दर महिन्यासाठी त्याच्याकडून ३६ चेक पुर्वीच घेण्यात आले आहेत. दोन दिवसात करार केला जाईल. ‘पे पार्किंग’ रस्त्यावर दरा सहित बोर्ड लावण्यात आले आहेत. १८ जून रस्त्यावर बहुतेक ठिकाणी ‘पे पार्किंग’साठी फलक लावण्याचे आणि रस्ते आखणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत पे पार्किंग रस्त्यावर आखणी आणि फलक दोन दिवसात लावले जाईल, असे महापौरांनी सांगितले.

पणजीत दुचाकी वाहने जास्त झाली आहेत. वाहतूक पोलिसांच्या सल्ल्याप्रमाणे दुचाकी वाहनांसाठी देखील पे पार्किंग असेल. १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर रस्ता, मनपा उद्याच्या सभोवतालचा रस्ता, कांपाल जागा या ठिकाणी पे पाकिर्ंग असेल. पणजीत सुमारे ५३० टॅक्सी पार्क केल्या जातात. रेंट अ बाईक रस्त्यावर ठेवल्या जातात. ‘पे पार्किंग’ मुळे त्यांना चपराक बसेल, असे महापौर म्हणाले.

तसेच कॅसिनोत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्याशेजारी पार्क केली जातात. त्यांना मल्टीलेवल कार पार्किंगमध्ये हलविण्यासाठी पहिल्यांदा निविदा काढण्यात जाईल. कारण सध्या या ठिकाणी पार्किंग केवळ चारचाकी वाहनांसाठी आहे. पे पार्किंग सुरु झाले की डबल पार्किंग करता येणार नाही. पोलिसांच्या मदतीने अशा वाहनांवर कारवाई केली जाईल.

स्वच्छता न राखल्याने डॉन बॉस्को बरोबरच मिरामार येथील २३ गाडे हटविण्यात आले आहेत. सध्या मिरामार येथे केवळ ७ गाडे आहेत यात ५ भेलपूरी आणि २ कोल्डड्रिंकचे गाडे आहेत. मार्केट संघटने सोबत बैठकीवेळी या गाडयांचे काय करायचे ते ठरविले जाईल. जेव्हा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिरामार येथे पाहणी केली, तेव्हा गाडेधारकांनी नियम पाळले नसल्याचे समोर आले. जेव्हा जिल्हाधिकार्‍यांकडे बैठक झाली. तेव्हा अस्वच्छतेमुळे गाडे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. या गाड्याबाबत पुढील निर्णय मनपाच्या बैठकित घेतला जाईल, असे महापौरांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या