पेडणे शहरात पे-टॉयलेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पेडणे:पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नुकतीच सुरू झालेली पर्यटन खात्यामार्फत पे-टॉयलेटमध्ये मुतारीसाठी पाच रुपये तर शौचालयासाठी दहा रुपये आकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

पेडणे:पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नुकतीच सुरू झालेली पर्यटन खात्यामार्फत पे-टॉयलेटमध्ये मुतारीसाठी पाच रुपये तर शौचालयासाठी दहा रुपये आकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
पेडणे शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व्हावे, अशी कित्येक वर्षांची मागणी होती.या भागाचे आमदार बाबू आजगावकर गोव्या राजाचे पर्यटनमंत्री मंत्री झाल्याने त्यांनी नवीन बस स्थानकासमोर पर्यटन खात्यामार्फत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी प्रयत्न केले.मात्र, आता त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची अशाप्रकारे लूट होत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत.या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता आम्ही पाच रुपये आणि दहा रुपये आकारतो, असे सांगितले जाते.केवळ २० मीटरवर पेडणे बसस्थानक आहे. त्या ठिकाणी दोन रुपये आणि पाच रुपये घेतात. तर मग तुमच्याकडे एवढे असे का? असे विचारले असता ते उत्तर देऊ शकले नाही.हे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले खरे.मात्र, त्या ठिकाणी महिलावर्ग जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. रस्त्याला लागूनच मुतारी बांधल्याने त्याचे दोन्ही दरवाजे रस्त्याच्या समोर आहेत त्यामुळे महिलावर्ग त्या ठिकाणी जायला मागेपुढे होतात. समोर ‘आडोसा’ करणे अत्यंत गरजेचे आहे.
पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्वच्छतागृह व्हावे, अशी मागणी स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांनी केली होती. याचा फायदा स्थानिक लोकांना, गरिबांना आणि गरजूंना व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता.या सर्व गोष्टींचा विचार करून या भागाचे आमदार तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी हे स्वच्छतागृह मोफत करावे, अशी मागणी गोपीचंदा आपुले यांनी केली आहे.
 

 

 

 

कासावलीतील रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध

संबंधित बातम्या