पेडणे तालुक्‍यात गॅम्‍बलिंग झोन नको

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पेडणे:पेडणे काँग्रेसचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन मागणी

पेडणे:पेडणे काँग्रेसचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन मागणी

पेडणे तालुक्‍यात होवू घातलेला गॅम्‍बलिंग झोन त्वरित रद्द करण्यात यावा.तसेच धारगळ येथे कसिनो सुरू करण्याच्या दृष्टीने सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी आम्हाला विश्‍वसनीय माहिती मिळाली असून पेडणे काँग्रेसचा अशा गोष्टींना तीव्र विरोध आहे, असे पेडणे काँग्रेस गट समितीतर्फे पेडण्याचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांना निवेदन सादर करुन मागणी केली.
पेडणे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष उमेश तळवणेकर, गोवा प्रदेश काँग्रेस समिती सदस्य सुभाष केरकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, काँग्रेस कार्यकर्ते मधुकर पेडणेकर, गोपीचंद आपुले, गजानन कांबळी, सुरेश साळगावकर, रामा साळगावकर आदी काँग्रेस कार्यकर्त्यांचा निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, पेडणे तालुक्‍याला चांगली संस्कृती आहे. कसिनो अथवा गॅम्‍बलिंग झोन सारख्या प्रकारात अनेक अनैतिक गोष्टी येतात, त्याचा येथील संस्कृतीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. गॅम्‍बलिंग झोन हा प्रकार पेडणे व गोव्याच्या संस्कृतीविरोधात आहे. या सगळ्या परिणामांचा विचार करुन पेडणे काँग्रेसचा गॅम्‍बलिंग झोन पेडणे तालुक्‍यात सुरू करण्यास तीव्र विरोध असून त्याला सरकारने परवाने देवू नयेत.
यानंतर पत्रकारांशी बोलताना पेडणे काँग्रेस अध्यक्ष उमेश तळवणेकर व सुभाष केरकर म्हणाले की, पेडणे मतदारसंघाचे आमदार या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गॅम्‍बलिंग झोनला आक्षेप घ्यायला हवा होता. पण आपल्या वैयक्‍तिक स्वार्थासाठी ते गप्प आहेत. रोजगार उपलब्ध करुन देणारा एखादा औद्योगिक प्रकल्प आणण्याऐवजी अशा जुगारी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्‍यात येत आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कोलवाळमधील इतरही बांधकामे पाडली

संबंधित बातम्या