मुंबईतून परतलेल्या ‘त्या’ दोघांबद्दल वास्कोत संशय

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

मुंबईतून परतलेल्या ‘त्या’  दोघांबद्दल वास्कोत संशय 

मुरगाव,

जहाजावर कामानिमित्त मुंबईत गेलेल्या वास्को परीसरातील काही कामगारांमधील दोघेजण गेल्या आठवड्यात वास्कोत परतल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरगाव बंदरात काम करणारा वास्को परीसरातील कामगारांचा एक गट मुंबईत जहाजावर काम करण्यासाठी गेला होता. क्रेन ऑपरेटर, फोरमन, टेली क्लार्क, मदतनीस असा हा कामगारांचा गट होता. दरम्यान, मुंबईत काम सुरू असतानाच कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. परिणामी कामानिमित्त मुंबईत गेलेले वास्को परीसरातील कामगार अडकून पडले. गेल्या २५ मार्चपासून ते सर्व कामगार मुंबईतच एका ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांनी गोव्यात परत येण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा त्यांना गोव्यात यायला दिले जात नाही. पण, या कामगारांच्या गटांमधील दोघा क्रेन ऑपरेटरना गोव्यात आणल्याची चर्चा सुरू असून, याविषयीची कल्पना पोलिसांनाही देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येत्या काही दिवसांत मुरगाव बंदरात बाॅक्साईटची जहाज येणार आहे.त्यासाठी क्रेन ऑपरेटरची आवश्यकता असल्याने त्यांना गोव्यात आणल्याची चर्चा आहे.
दरम्यान,हल्लीच खानापूरहून हेडलॅनड सडा येथे आलेल्या एका भाडेकरुला होम क्वारंटाईन केल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या