काणकोणात जनसहभागातून घर बांधणी

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

दहा दिवसापूर्वी घरावर झाड उन्मळून पडून घराचे छप्पर जमिनदोस्त झाले होते. अनेकांनी एकत्र येत गरिब कुटूंबाच्या घर दुरूस्तीसाठी मदत केली.

काणकोण

तळपण येथील संगीता रघू कोमरपंत हिच्या झाड पडून कोसळलेल्या घराची लोकसहभागातून दुरूस्ती करण्यात आली आहे.दहा दिवसापूर्वी घरावर झाड उन्मळून पडून घराचे छप्पर जमिनदोस्त झाले होते. अनेकांनी एकत्र येत गरिब कुटूंबाच्या घर दुरूस्तीसाठी मदत केली. कोमरपंत याचे घर उभे करण्यासाठी उपसभापती इजिदोर फर्नाडीस, माजी मंत्री रमेश तवडकर,माजी.नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर,नगरसेवक गुरू कोमरपंत,समाज कार्यकर्ते किशोर पागी,घाणेबाग येथील मेत्री समाज संघटना,मास्तीमळ येथील रामनाथ कोमरपंत,गालजीबाग येथील मोहन मेत्री,तळपण येथील सुविधा प्रभू,भाजपचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, पंकज नमशीकर, पंच रूद्रेश. नमशीकर, पाटणे येथील संतोष कोमरपंत,राजू कोमरपंत,रघुवीर कोमरपंत,सुरज कोमरपंत,तळपण येथील एक्टिव्ह बॉयस संघटना,गालजीबाग येथील विनोद नाईक,राजू मोखर्डकर,संतोष मेत्री,विकास प्रभू या सर्वानी  आर्थिक मदत दिली.घर कोसळल्यावर उपसभापती फर्नाडीस यांनी घराची पहाणी करून कुटुबियाना धीर दिला होता घराची दुरुस्ती केल्यानंतर उपसभापती इजिदोर फर्नाडीस यानी भाजप मंडळ अध्यक्ष महेश नाईक स्थानिक पंच रूद्रेश नमशीकर, संजू तिळवे याच्यासहीत कुटूंबाची भेट घेतली.

संबंधित बातम्या