वजन व मापे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांशी चांगले वागावे : फिलीप नेरी रॉड्रिगीस

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस पुढे म्हणाले, हे खाते लहान असले तरी व्यापक जनसंपर्क असलेले ते महत्त्वपूर्ण खाते आहे.

म्हापसा: वजन व मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागावे. खात्याचे अधिकारी सतावणूक करीत आहेत, असे ट्रेडर्स तसेच नागरिकांना वाटू नये. सर्व नागरिकांशी नातेसंबंध प्रस्थापित करणारे हे खाते आहे. या खात्याचे कर्मचारी सतावणूक करीत असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत येऊ नये, असा स्पष्ट इशारा वजन व मापे खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी म्हापसा येथे बोलताना दिला.
म्हापसा येथे वजन व मापे खात्याच्या कार्यालयात पेट्रोल टॅंकर तपासणी यंत्राचे रीतसर उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार जोसुआ डिसोझा, ग्लेन टिकलो, नगरसेवक संदीप फळारी आणि वजन व मापे खात्याचे नियंत्रक पी. एस. शिरोडकर उपस्थित होते.
परंतु, या खात्यातील लहानसहान तक्रारींबाबत लोकांना आमदारापर्यंत जावे लागते, ही खात्याच्या दृष्टीने अशोभनीय बाब आहे. असे घडून नये. त्यामुळे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, लोकांना त्रास करून आम्ही पुढे जाऊच शकत नाही. ही नवीन सेवा घेऊन आम्ही म्हापशात आलो आहोत. येथील कलेक्‍शन सेंटरचा सर्व वितरकांनी लाभ घ्यावा. त्यांची अनेक वर्षांची मागणी आज पूर्णत्वाकडे आली आहे, असेही मंत्री रॉड्रिगीस यांनी स्पष्ट केले.
या पूर्वी सर्व वितरकांना तपासणीसाठी मडगावला जावे लागायचे. वाहतुकीचा खोळंबा, रागेत ताटकळत राहणे अशा कारणांमुळे त्यांचा वेळ वाया जात होता. आता उत्तर गोव्यात कलेक्‍शन सेंटर सुरू करण्यात आल्याने त्याचा फायदा सर्व ट्रेडर्सना होणार आहे.

 

 

 

वन येथे गणेशजयंती उत्साहात साजरी

 

संबंधित बातम्या