तमिळनाडूच्या बुद्धिबळपटूंना `पोडियम`

dainik gomantak
रविवार, 3 मे 2020

याशिवाय व्हिवान बाळ्ळीकरने १७वा, शेन ब्रागांझाने १८, सुयन बेलुरकरने २४वा, तर स्नेहिल शेट्टी, तेजस वेर्णेकर, मिलिंद गावस, जॉय काकोडकर व हर्ष डागरे यांनी अनुक्रमे २६ ते ३०वा क्रमांक मिळवून बक्षीस विजेत्या खेळाडूंत स्थान मिळविले.

पणजी, (क्रीडा प्रतिनिधी)

ताळगाव येथील क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तमिळनाडूच्या इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंनी पोडियम फिनिश मिळविले. गोमंतकीय खेळाडूंत नीतिश बेलुरकर, ऋत्विज परब, रुबेन कुलासो यांनी चमक दाखविली.

विजेतेपद मिळविलेल्या सरवणा कृष्णन याने साडेसात गुणांची कमाई केली. सी. प्रवीण कुमार व अर्जुन कल्याण यांचे समान सात गुण झाले. टायब्रेक गुणांत त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.

गोमंतकीय बुद्धिबळपटूंत फिडे मास्टर नीतिश बेलुरकर, ऋत्विज परब यांनी चमक दाखविली. साडेसहा गुणांसह नीतिशने पाचवा, तेवढेच गुण मिळवून ऋत्विजने आठवा क्रमांक प्राप्त केला. रुबेन कुलासो, अनिरुद्ध पार्सेकर व पार्थ साळवी यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई करताना अनुक्रमे नववा ते अकरावा क्रमांक पटकाविला.

याशिवाय व्हिवान बाळ्ळीकरने १७वा, शेन ब्रागांझाने १८, सुयन बेलुरकरने २४वा, तर स्नेहिल शेट्टी, तेजस वेर्णेकर, मिलिंद गावस, जॉय काकोडकर व हर्ष डागरे यांनी अनुक्रमे २६ ते ३०वा क्रमांक मिळवून बक्षीस विजेत्या खेळाडूंत स्थान मिळविले. रिदिकेश वेर्णेकर, सूरज काळे, जेनिसा सिक्वेरा, तन्वी हडकोणकर, प्रसन्ना स्वामी, वसंत नाईक यांनी गोमंतकीय खेळाडूंत बक्षीस प्राप्त केले. 

 

संबंधित बातम्या