गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्गात चोऱ्या करणाऱ्यास अटक

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

सावंतवाडी: दिवसाढवळ्या घरफोड्या करून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट करणारा प्रकाश विनायक पाटील (रा. पर्ये-सत्तरी गोवा) या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २० चोऱ्यांची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अधिक तपासासाठी कर्नाटक, गोवा पोलिसांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या चोरट्याने गोव्यातही अनेक चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.

सावंतवाडी चराठे व माजगाव येथे घरफोड्या केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित पाटील याला दोडामार्गमधून ताब्यात घेतले. श्री. गेडाम म्हणाले, 

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

‘संशयिताच्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ५७ तोळे सोने, एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दुचाकी व साडेदहा हजार रुपयांची रोकड, सोने वितळण्याचे मशीन आदी मुद्देमाल जप्त केला आहे. तो अट्टल गुन्हेगार असून त्याने गोवा, कर्नाटक, निपाणी परिसरात घरफोड्या केल्या आहेत. त्याच्यावर ७० गुन्हेही दाखल आहेत.सावंतवाडी, बांदा, कुडाळ परिसरातही त्याने आठ घरफोड्या करून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे चोरटा दिवसाढवळ्या चोरी करण्यात पटाईत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.’
 
संबंधित बातम्या