चोरी प्रकरणातील संशयीत मिरजेत गजाआड  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

वाळपई:चोरी प्रकरणातील संशयित मिरजेत गजाआड
चार दिवसांची पोलिस कोठडी वाळपई पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक
केरी सत्तरी भागात गेल्यावर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याच्या काळात दुकाने व घरे फोडून रूपये लंपास करणारा अट्टल चोर वाळपई पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत मिरज (महाराष्ट्र) येथे गजाआड केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत अभिनंदन केले.या चोरीप्रकरणी संशयित नासीर उर्फ इरफान इसाक मदनाली (३३, रा. चिंबल-तिसवाडी, मुळ रा. तारगाव हल्याळ कारवार कर्नाटक) या इसमास अटक करून वाळपई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत माहीती अशी की, केरी सत्तरी भागात गतवर्षी चोरीचे प्रकार वाढले होते.काही दुकाने, घरे फोडून त्यातील टीव्ही व रोकड रूपये लंपास केले जात होते.त्यामुळे केरी सत्तरी भागातील लोकांनी चोराला लवकरच पकडावा अशी मागणी वाळपई पोलिस निरिक्षक शिवराम वायंगणकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी आपली तपास यंत्रणा जलदगतीने हाती घेतली.प्रथम केरी भागात चोरी केलेल्या क्षेत्रातील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा संशयित दिसला होता.पोलिस सहाय्यक निरिक्षक सर्वेश गड्डी यांनी तपास हाती घेऊन संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून मोबाईल नंबर लोकेशनमध्ये टाकून तपास सुरू केला होता.
वाळपई पोलिसांनी कारवार येथे जाऊन संशयितास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.पण संशयित अन्य ठिकाणी जाऊन स्थान बदलत होता.मोबाईल नंबरच्या माध्यमातून तो कुठे आहे या लोकेशनचे काम सुरूच ठेवले होते.त्यानुसार संशयित नासीर हा महाराष्ट्रात मिरज येथे असल्याचे समोर आले.त्याच आधारावर माग काढील निरिक्षक शिवराम वायंगणकर व सहाय्यक निरिक्षक सर्वेश गड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आपा गावकर व स्नेहल गावकर हे काल रविवारी मिरज येथे जाऊन शोध घेत दबा धरून बसले होते. संशयित काल रविवारी रात्री ७.४५ च्या दरम्यान मिरज येथे बस स्थानक, रेल्वे स्थानक व दर्गा जवळील रस्त्यावर फिरत असताना दिसला.मोबाईल लोकेशनमुळे काम फत्ते झाले होते.
वाळपई पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने वाळपई पोलिस स्थानकात आणण्यात आले.या चोरीप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४५७ व ३८० नुसार गुन्हा नोंद केला आहे. चौकशी तपासात त्यांनी केरी बरोबरच पेडणे, डिचोली, फोंडा या भागातही चोरी केल्याचे सांगितले आहे.संशयिताने केरीतील दुकाने, घर फोडून हजारो रूपये चोरले होते.त्याचा फटका दुकान व्यवसायिकांना बसला होता.वाळपई पोलिस निरिक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास काम करण्यात आले.

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण विल्सन गुदिन्हो यांची न्यायालयात धाव

संबंधित बातम्या