राज्यातील पोलिसांना प्रोत्साहनाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजी ः गोव्यातील पोलिस नेहमीच शांती, सेवा, न्याय या तत्वांना समोर ठेवून काम करतात. निरपराध लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून ते झटत असतात. अगदी विदेशातील लोकही गोव्यात आल्यावर राज्यातील पोलिसांच्या विश्वासावर येथे फिरू शकतात, कारण त्यांना येथील पोलिसांवर विश्वास आहे. अशा रक्षकांना आपण प्रोत्साहन दिले तर त्यांना काम करण्यास अधिक हुरूप येतो, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

पणजी ः गोव्यातील पोलिस नेहमीच शांती, सेवा, न्याय या तत्वांना समोर ठेवून काम करतात. निरपराध लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून ते झटत असतात. अगदी विदेशातील लोकही गोव्यात आल्यावर राज्यातील पोलिसांच्या विश्वासावर येथे फिरू शकतात, कारण त्यांना येथील पोलिसांवर विश्वास आहे. अशा रक्षकांना आपण प्रोत्साहन दिले तर त्यांना काम करण्यास अधिक हुरूप येतो, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

कला अकादमी दर्या संगम येथे झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मुख्य सचिव परिमल राय, पोलिस महानिरिक्षक जसपाल सिंग, राज हाऊजिंगचे उद्योजक संदीप निगळ्ये व राजश्री क्रिएशन्सचे प्रमुख परेश नाईक आदी मान्यवर तसेच गोमंतकीय कलाकार, समाजसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विदेशी काजुमुळे दरावर परिणाम : प्रकाश वेळीप

राज हौसिंग प्रस्तुत राजश्री क्रिएशनचा स्वाभिमान २०२० सालचा पोलिस कॉन्स्टेबल विभागातील पुरस्कार कॉन्स्टेबल देवेश कुट्टीकर, कॉन्स्टेबल अजय नाईक आणि कॉन्स्टेबल सोनाली आरोलकर यांना देऊन गौरविण्यात आले. निवृत्त पोलिस अधिकारी विष्णुदास वेर्णेकर यांना जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.

यावर्षी प्रथमच येथे स्वाभिमान २०२० चे सरकारी अधिवक्ता पुरस्कार मिलेना गोम्स इ पिंटो यांना आणि अनुराधा तळावलिकर यांना देण्यात आला. स्वाभिमान स्पेशल ज्युरी २०२० पुरस्कार पीआय अविनाश नाईक यांना तर समाजमित्र हा पुरस्कार पीआय फिलोमेना कोस्ता यांना प्रदान करण्यात आला. स्वाभिमान २०२०चा एसपी पुरस्कार बॉसुएट डिसिल्व्हा यांना देण्यात आला तर डीवायएसपी पुरस्कार डीवायएसपी सुचिता देसाई, सेराफिन डायस आणि महेश गावकर यांना देण्यात आले. स्वाभिमान २०२०चा हेड कॉन्स्टेबल पुरस्कार हेड कॉन्स्टेबल विकास मांद्रेकर, बशीर मुल्ला, अनिता खोलकर यांना देऊन गौरविण्यात आले. एएसआय शोभा काणकोणकर, एएसआय श्याम देसाई आणि एएसआय सुरेंद्र कोमरपंत यांना स्वाभिमान हेड कॉन्स्टेबल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पीएसआय या विभागातील पुरस्कार पीएसआय पेदरो फर्नांडिस, रत्नाकर कलंगुटकर, सुनैना साळगावकर यांना गौरविण्यात आले. स्वाभिमान २०२०चा पीआय विभागातील पुरस्कार पीआय सुदीक्षा नाईक, तुषार लोटलीकर, सलीम शेख यांना देण्यात आला.

मटका व्‍यवसाय कायदेशीर करावा

यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांमध्ये महापौर उदय मडकईकर, अभिनेते आर्यन खेडेकर, प्राजक्ता निगळे, योगेश अरोरा, अमन लोटलीकर, गुरुदास नाटेकर, संदीप जस्वाल, अतुल बापट आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतील कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला विशेष पसंती मिळाली. कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांनी सादर केलेल्या हास्य नाटकाचा आनंद उपस्थितांनी लुटला. त्यांना पाहण्यासाठी दर्या संगमावर चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती.

 

संबंधित बातम्या