जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे यांच्या बदल्या झाल्या

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

१० निरीक्षकांसह ५६५ पोलिस बदल्या
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

बदली झालेल्या उपनिरीक्षकांमध्ये ४६ जणांचा समावेश आहे त्यामध्ये पुरुष व महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक ते कॉन्स्टेबल्सपर्यंत पदाच्या ४०९ जणांची बदली करण्यात आली आहे. हा बदली आदेश २० फेब्रुवारीला काढण्यात आला आहे.

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस खात्यातील १० पोलिस निरीक्षकस ४६ उपनिरीक्षकांसह ५६५ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश पोलिस मुख्यालय अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी काढला. बदली झालेल्या या पोलिसांनी त्वरित ताबा घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

मायणा - कुडतरीचे पोलिस निरीक्षक गुरुदास कदम यांची दाबोळी विमानतळ पोलिस ठाणे येथे, वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रातील निरीक्षक हिरू कवळेकर यांची कोलवा वाहतूक पोलिस कक्षात, सीआयडी क्राईम ब्रँचचे निरीक्षक परेश नाईक यांची मुरगाव पोलिस ठाण्यात, मुरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पोवार यांची पणजी सुरक्षा विभागात,

आर्थिक गुन्हे कक्षाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांची बेतुल किनारपट्टी सुरक्षा पोलिस ठाण्यात, काणकोणचे निरीक्षक रमेश शिरोडकर यांची आर्थिक गुन्हे कक्षात, अतिरेकीविरोधी कक्षाचे निरीक्षक सचिन लोकरे यांची शापोरा किनारपट्टी सुरक्षा पोलिस ठाण्यात, दाबोळी विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर एकोस्कर यांची मायणा - कुडतरी येथे, गोवा राखील पोलिस दलाचे निरीक्षक सोमनाथ महाजिक यांची क्राईम ब्रँचमध्ये तर सुरक्षा विभागातील निरीक्षक विरेंद्र वेळुस्कर यांची पेडणे वाहतूक पोलिस कक्षात झाली आहे.

 

 

देशातील पहिल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण

संबंधित बातम्या