खोर्ली येथे आज वीजपुरवठा खंडित

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

तिसवाडी तालुक्यातील खोर्ली येथील खोर्ली औद्योगिक वसाहतीच्याजवळ असलेल्या उपविभाग १ च्या उपविभागीय अभियंता कार्यालयातर्फे माहिती खात्याला पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये वीज पुरवठा खंडीत राहण्याविषयी अधिसूचना तसेच कुठल्या फिडरवर किती प्रमाणात वीजेचा दबाव असेल याविषयीचा तपशील पाठविण्यात आलेला आहे.

पणजी : तिसवाडी तालुक्यातील खोर्ली येथील काही भागांमध्ये तसेच खोर्ली औद्योगिक वसाहतीच्या परिसरात ता. २७ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे खोर्ली येथे असलेल्या उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून माहिती खात्याच्या संचालकांना पाठविलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

सदर पत्रामध्ये खोर्ली येथील खोर्ली औद्योगिक वसाहत व इतर आसपासच्या परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खोर्ली येथील काही भागांमध्ये किती प्रमाणात वीजेचा दाब कुठल्या ठिकाणी राहील याविषयीही तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : गोवा मानवाधिकार आयोगाचा कारोभार यांच्या हाती

यामध्ये दिवाडी येथे असलेल्या ११ केव्ही फिडरमध्ये १०० केव्हीए क्षमता असलेल्या छामेरे या भागात ६० पर्यंत दाब राहणार आहे. गायकवाड (१०० केव्हीए क्षमता) येथे ७०, माडेल स्कूल (२०० केव्हीए क्षमता) परिसरात १५०, माडेल फिश पाँड (२०० केव्हीए) परिसरात ९० एवढा वीजेचा दाब राहणार आहे. दिवाडी येथील ११ केव्ही क्षमता असलेल्या दुसऱ्या फिडरमध्ये गावोणा (२०० केव्हीए) परिसरात १३०, काराभाट (१०० केव्हीए) परिसरात ८०, काराभाट डॉक (६३ केव्हीए) या बंदर परिसरात ३०, बेलभाटे (२०० केव्हीए) या परिसरात १६० तर कोनाल्डे (१०० केव्हीए) या परिसरात ८० पर्यंत उच्च दाब राहणार असल्याचे संबंधित उपविभागीय अभियंता कार्यालय, खोर्ली यांच्याकडून माहिती खात्याला कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Tags