प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण  

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

संशयित विल्सन गुदिन्हो याच्या
अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी

पणजी : मेरशी पंच प्रकाश नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित विल्सन गुदिन्हो यांच्या अटकपूर्व जामिनावरील अर्जात प्रकाशची बहीण अक्षया गोवेकर हिने लेखी बाजू मांडली आहे. त्यातील मुद्यांना उत्तर देण्यासाठी संशयिताच्या वकिलांनी आज वेळ मागितल्याने ही सुनावणी पुन्हा शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) ठेवण्यात आली आहे.

संशयित विल्सन गुदिन्हो याच्याविरुद्ध प्रकाश नाईक याला आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्याप्रकरणात आजही कोणताच बदल झालेला नाही. तपासकाम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यात जर तपासकामात काहीच बदल झालेला नसले तर सत्र न्यायालयाने फेटाळलेला अटकपूर्व जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येत नाही असे अक्षयाने सादर केलेल्या लेखी बाजूमध्ये उल्लेख केला आहे. त्यावर संशयिताच्या वकिलांना स्पष्टीकरण करायचे असल्यास करावे, असे आज न्यायालयाने सांगतिल्यावर वेळ घेण्यात आली.

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने असमाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडी क्राईम ब्रँचने प्रकाश नाईक याला गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले तेव्हा त्याच्यासोबत कोण होते त्यांन जबानीसाठी बोलावण्यात आले आहे. संशयितांच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात केलेल्या युक्तिवादावेळी अक्षया गोवेकर हिने घटनास्थळचा पुरावाच नष्ट केल्याने तिच्यावरही गुन्हा पोलिसांनी दाखल करायला हवा, असा मुद्दा उपस्थित केल्यावर मेरशी परिसरात तिला पोलिस अटक करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांना विचारले असता तसे काहीच घडलेले नाही, असे स्पष्टीकरण करण्यात आले. पोलिसांनी संशयिताच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला आहे. त्याची जबानी तपासकामासाठी महत्त्वाची असल्याचे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

 

डेडलाईनची धास्ती

संबंधित बातम्या