संशयित गुदिन्हो व हस्तक्षेप अर्जावर आज गोवा खंडपीठासमोर सुनावणी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण

संशयित विल्सन गुदिन्हो याला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात त्या आदेशाला आव्हान दिले आहे.या अर्जावरील सुनावणीवेळी संशयिताच्या विरोधात बाजू मांडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती हस्तक्षेप अर्जात अक्षया नाईक हिने केली आहे.

पणजी: मेरशी पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील संशयित विल्सन गुदिन्हो याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये नाईक याची बहीण अक्षया नाईक हिने हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे. या दोन्ही अर्जावरील सुनावणी  ४ फेब्रुवारीला खंडपीठाने ठेवली आहे.

संशयिताच्या सतावणुकीमुळेच व ब्लॅकमुळे आपल्या भावाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्येस तो पूर्ण जबाबदार आहे त्यामुळे अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये अशी विनंती केली आहे.
दरम्यान, संशयिताची बाजू मांडत असलेले ज्येष्ठ वकिल नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, या हस्तक्षेप अर्जाला विरोध करण्यात येणार आहे. संशयिताविरुद्ध बाजू मांडण्यास पोलिस यंत्रणा आहे. संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यास पोलिस आहेत, त्यामुळे हस्तक्षेप अर्जाला मान्यता दिली जाऊ नये. सत्र न्यायालयात पोलिसांनी संशयिताच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज सादर करणे हा त्यांचा अधिकार आहे, असा त्यांचा दावा आहे. मात्र पोलिस बाजू मांडत असल्याने हस्तक्षेप अर्जदार पोलिसांना मदत करू शकतो त्यासाठी आणखी वेगळ्या अर्जदाराला बाजू मांडण्यास परवानगी देण्याची गरज वाटत नाही, असे मत ॲड. सरदेसाई यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास जुने गोवे पोलिसांकडून तो आता सीआयडी क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात जुने गोवे पोलिसांनी काहींच्या जबान्या नोंद केल्या होत्या त्यांना अधिक माहितीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मयत प्रकाश नाईक याच्या मोबाईलमधील माहिती जमा केली आहे व ती तपासून पाहण्यासाठी संशयितास पोलिस कोठडी हवी आहे असा मुद्दा उपस्थित केला आहे.

 

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील नुने येथील वनखात्याकडूनच वासराला मुठमाती

संबंधित बातम्या