विल्सन गुदिन्हो यांचा अटकपूर्व जामिनासाठी धाव

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण विल्सन गुदिन्हो यांची न्यायालयात धाव
अटकपूर्व जामिनावर आज होणार सुनावणी
मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याने विल्सन गुदिन्हो
यांनी प्रधान सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.या अर्जावर सुनावणीवेळी गुदिन्हो यांच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचे सांगितल्याने ही सुनावणी आता (२१ जानेवारी) दुपारी ठेवली आहे.

पणजी:प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण विल्सन गुदिन्हो यांची न्यायालयात धाव
अटकपूर्व जामिनावर आज होणार सुनावणी
मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याने विल्सन गुदिन्हो
यांनी प्रधान सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.या अर्जावर सुनावणीवेळी गुदिन्हो यांच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचे सांगितल्याने ही सुनावणी आता (२१ जानेवारी) दुपारी ठेवली आहे.
अर्जदार विल्सन गुदिन्हो यांनी सादर केलेल्या अर्जात प्रकाश नाईक यांनी व्हॉटस्अप ग्रुपवर पाठविलेल्या संदेशात नाव नमूद करून जो आरोप केला आहे तो खोटा आहे.त्यांच्याशी कोणताच व्यावसायिक व्यवहार झालेला नाही.अर्जदाराची मेरशी पंचायतीविरुद्ध पंचायत खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे. त्याव्यतिरिक्त प्रकाश नाईक याच्याशी अर्जदाराचा काहीच संबंध नाही.अर्जदाराचा भाऊ मंत्री असल्याने विरोधकांकडून याप्रकरणात अर्जदाराला अटक होण्यासाठी दबाव घातला जात आहे.या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अर्जदाराला अटक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या अटकपूर्व जामिनाला जुने गोवे पोलिसांनी आज प्रथमदर्शनी सुनावणीवेळी विरोध केला.अर्जदाराच्या वकिलांना पोलिसांनी तक्रारीची प्रत दिलेली नाही.काय तक्रार दिली आहे याची अर्जदाराला कल्पना नाही.त्यामुळे ही सुनावणी तहकूब करावी अशी विनंती न्यायालयाला केली.आज सुनावणीवेळी अर्जदार विल्सन गुदिन्हो न्यायालयात उपस्थित होते.जुने गोवे पोलिसांनी विल्सन गुदिन्हो व ताहीर या दोघांविरुद्ध प्रकाश नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.ताहीर याने अजून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला नाही.प्रकाश यांची बहीण अक्षया गोवेकर यांनी गेल्या शनिवारी तक्रार दाखल केल्यावर हा गुन्हा नोंद करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रकाश यांच्या मोबाईलवर घटनेच्या आदल्या दिवशी ज्यांनी फोन केले त्यांची जबानी नोंद करण्यात येत आहे.आतापर्यंत अनेकांना बोलावून चौकशी करण्यात आली आहे.

नेत्रावळी क्षेत्रातील प्रलंबित दावे निकालात

नाईक कुटुंबियांबाबत सहानुभूती
मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांच्या मृत्यूबद्दल विल्सन गुदिन्हो यांनी त्यांच्या कुटुंबियांबाबत सहानुभूती व्यक्त करताना सांगितले, की या प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे होऊन त्याचा योग्य तो निष्कर्ष निघेल. तपासकाम सुरू असल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत मी या क्षणी काहीच वक्तव्य करू इच्छित नाही.
 

संबंधित बातम्या