उसगाव मतदारसंघात जि. पं. साठी मोर्चेबांधणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

फोंडाः उसगाव जिल्हा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून इच्छुक उमेदवारांमध्ये मोर्चे लांबणीला सुरुवात केली आहे. राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका पक्ष पातळीवर होणार असून त्यासाठी उसगावचे इच्छुक उमेदवार व पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहे. मगो पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत ५० पैकी ३० जागा लढवण्याचे ठरवले आहे.

उसगावात यंदा इच्छुक उमेदवारांची नावे खाजगीत बोलले जात असून जिल्हा पंचायत सदस्य ज्ञानेश्वरर नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आमदार विश्वजित राणे यांच्या जिल्हा पंचायत उमेदवारासाठी स्पर्धा चालू असून कुणाच्या गळ्यात उमेदवारांची माळ पडते. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उसगावात मगो पक्ष आपला उमेदवार उतरणार असून त्यासाठी विचार चालू आहे.

तसेच अपक्ष उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्य ता आहे. जिल्हा पंचायत उमेदवारांची नावे खाजगीत चर्चेत असली तरी सध्यातरी त्यावर प्रश्नचचिन्ह आहे. सध्या उसगावात जिल्हा पंचायत उमेदवार ठरविण्यासाठी पक्षांच्या त्या त्या कार्यकर्त्यांच्या गुप्त खलबते चालू आहे. जसजशी जिल्हा पंचायत निवडणुकीचे दिवस येतील तसतसे सर्व पक्षांतर्फे उमेदवारांचा अंतिम निर्णय होईल.

संबंधित बातम्या