हिंदुत्ववादी संघटनांचे ‘एनआरसी’ला समर्थन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः बांग्लाकदेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातही असे अनेक गुन्हेी होत आहेत. ज्यापमध्येो घुसखोरांचा समावेश आहे. देशासह राज्याचलाही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरसी) कायद्याची तातडीने गरज आहे. हा कायदा लवकरात लवकर लागू करून बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली.

राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शनिवारी पणजीतील आझाद मैदानावर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली सभा घेण्यातत आली. देशव्यापी हिंदू आंदोलनाचाच हा एक भाग असल्याचचे यावेळी सांगण्याात आले. येथे राज्यातील विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. गोविंद चोडणकर, जयेश थळी, शैलेश बहेरे व अन्य सदस्यही यावेळी उपस्थिसत होते.

बांग्लादेशी घुसखोरांकरवी निर्माण करण्यायत येणाऱ्या समस्यां च्याा बाबतीत उपाययोजना म्हणून राज्यात एनआरसी लागू करावा आणि या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढावे, ही आमची पहिली मागणी आहे. तसेच ‘सनबर्न क्लासिक’ च्या परिसरात तीन युवकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशा मागण्यां यावेळी सरकारकडे करण्यातत आल्या्.

राज्यातील एटीएम मशिन फोडणे, खून अशा अनेक गुन्ह्यांत बांग्लादेशी घुसखोऱ्यांचे नाव समोर आले आहे. बांग्लादेशी घुसखोर वेश्याव्यवसायातही गुंतलेले आहेत. बांग्लादेशी घुसखोऱ्यांची सूची घोषित करून त्यांना राज्यात कुठेच नोकरी किंवा आश्रय मिळू नये, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आझाद मैदानावर जमलेल्यांनी यावेळी ‘बांग्लादेशींची घुसखोरी बंद करा’, ‘सनबर्नवर बंदी घाला’, ‘एनआरसी लागू करा’ अशा घोषणा देण्यात आल्या.  
          
संबंधित बातम्या