राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठचा प्रस्ताव

goa- university
goa- university

पणजी:गोव्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ हवे
उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळकेर यांचा वित्त आयोगासमोर प्रस्ताव
गोव्यात कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रीय कृषी विद्यापीठ उभारण्यासाठी ४१० कोटी व पुरातन वस्तू संग्रहालय खात्यातील पोर्तुगीज दस्ताऐवजच्या भाषांतर व डिजीटायझेशनसाठी अनुक्रमे १२०० कोटी व ३०० कोटी मिळून सुमारे १९१० कोटी निधीचा प्रस्ताव आज १५ व्या वित्त आयोगासमोर झालेल्या बैठकीवेळी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी दिली.
येत्या २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने व्हावे असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.त्यामुळे कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.त्यासाठी राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठाची गरज आहे.त्यामुळे या विद्यापीठात शिक्षण, संशोधन, प्रयोगशाळा, प्रमाणपत्र तसेच मार्केटिंग व ब्रँडिंग राज्यातच करणे शक्य होणार आहे.त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबर राज्याला होईल.त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळू शकतो व शेजारील राज्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.गोवा हे पर्यटन राज्य असले तरी ८० टक्के ग्रामीण भागात येते व त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.आयोगाने यासाठी मदत करण्याची विनंती केली असल्याचे कवळेकर म्हणाले.
गोवा मुक्तीपूर्वी येथील लोकांचे जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी तसेच मालमत्तेचे दाखले हे पोर्तुगीज भाषेत आहेत.काही दाखले हे जीर्ण झाले आहेत.पोर्तुगीज दस्तऐवज इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी अधिकृत भाषांतराकडून भरमसाट रक्कम आकारली जाते.लोकांना हे दाखले भाषांतर करून मिळण्यासाठी तसेच डिजीटायझेशनसाठी आयोगाकडे मदत मागण्यात आली असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

पोर्तुगीज दस्तऐवज भाषांतरासाठी १३०० कोटी,
डिजीटायझेशनसाठी ३०० कोटींची मागणी

पुरातन वस्तू संग्रहालयात विविध दस्तऐवजाच्या सुमारे २ लाख पुस्तिका असून त्यामध्ये सुमारे ४ कोटी पाने आहेत.त्यामुळे भाषांतरासाठी किमान १२०० कोटी,तर डिजीटायझेशनसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव आयोगाला देण्यात आला आहे.यामुळे लोकांनाही सुविधा उपलब्ध होतील व राज्य सरकारलाही त्यातून उत्पन्न मिळेल असेआयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com