इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊनच माणसाला वर्तमानात चालावे लागते:सोलापूरकर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पर्वरी:जो तरुण आपल्या देशाचा इतिहास विसरतो. त्याचा वर्तमान काळ लडखडत असतो
आणि भविष्य काळ अंधारात असतो.इतिहासाच्या पाऊल खुणा घेऊनच माणसाला वर्तमानात चालावे लागते. तेव्हाचा भविष्याचा वेद घेता येतो, असे उद्‌गार सुप्रसिद्ध सिनेकलाकार राहुल सोलापूरकर यांनी काढले.
भारत विकास परिषद आणि जनहित मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या शारदा व्याख्यानमालेत ‘समर्थ राष्ट्रासाठी समर्थ तरुण’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद अध्यक्ष प्रदीप लोटलीकर, गोविंद काळे, कुमार प्रिवोळकर, संगम चोडणकर उपस्थित होते.

देश हा भौगोलिक सीमा रेषांशी सिमीत असतो.पण, राष्ट्र याचा अर्थ जास्त व्यापक असतो.राष्ट्रामध्ये त्या राष्ट्रात राहणाऱ्यांची मानसिकता,सांस्कृतिक आणि बौद्धीकता या क्षमतेचा समावेश असतो.आणि याच्यावरच राष्ट्राची उभारणी असते.वैज्ञानिक प्रगती झाली म्हणजे तरुण सर्वाथाने श्रेष्ठ झाला, असे होत नाही.त्यबरोबरच संस्कार ही महत्त्वाचे आहेत.संगणकामधील शॉर्टकट जीवन जगताना उपयोगी नाहीत.विज्ञाननिष्ठ भूमिका घेताना या देशाचा धार्मिक, सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे सोलापूरकर यांनी सांगितले.
आजचा तरुण टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे.पण, शास्त्र प्रगत होत असताना आपले मनही प्रगत व्हायला पाहिजे. भावनाशून्य मन या देशाच्या प्रगतीसाठी मारक आहे.आज विज्ञानाने भरीव प्रगती केली आहे.पण, ते समजण्यासाठी जर आपल्या मनाची, बुद्धीची कक्षा रुंदावण्याची गरज आहे, असे सोलापूरकर यांनी सांगितले.
आजचा तरुण समर्थ होणे म्हणजे या देशाची संस्कृती, इतिहास, मूल्ये जपणे आणि रुजविणे, असे मला वाटते.

जर आजचा तरुण भरकटत असेल तर त्याला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.त्याला त्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करायला पाहिजे.योग्य शब्द वापरण्याची सवय लावायला पाहिजे.त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार द्यायला पाहिजे.तेव्हाच देश एक समर्थ राष्ट्र म्हणून पुढे येयील यात शंका नाही, असे सोलापूरकर यांनी सांगितले.

दिनेश एकावडे आणि संपदा सांगेलकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.चैताली गावस यांनी सूत्रसंचालन केले. संगम चोडणकर यांनी आभार मानले.

खांडोळा येथे बंगला फोडला

संबंधित बातम्या