रेल्वे कर्मचारी खलिल इराणी निलंबित

Dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोनाचे भय असल्याने वसाहतीतील लोक घाबरून गेले. त्यांनी हा प्रकार वास्को पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात गोव्याबाहेरील लोकांना प्रवेश निषिद्ध असतानाही मालवाहू रेल्वेतून वास्को पर्यंत आलेल्यांना आश्रय दिल्याच्या कारणावरून खलिल इराणी यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुरगाव,

मालवाहू रेल्वेतून वास्कोत आलेल्या कर्नाटकमधील सात जणांना ड्रायवरहिल येथील रेल्वे वसाहतीत आश्रयास ठेवल्याप्रकरणी दक्षिण-पच्शिम रेल्वे प्रशासनाने वास्को रेल्वे स्टेशनवरील कर्मचारी खलिल अहमद इराणी याला निलंबित केले आहे.
हुबळी, केसरलॉक येथील सातजण मालवाहू रेल्वेतून वास्कोपर्यंत आले होते. वास्कोत आल्यावर त्यांना ड्रायवरहिल येथे असलेल्या रेल्वेच्या वसाहतीत खलिल इराणी यांनी आश्रय दिला होता. हा प्रकार वसाहतीतील इतरांना कळल्यावर एकच गोंधळ माजला होता. कोरोनाचे भय असल्याने वसाहतीतील लोक घाबरून गेले. त्यांनी हा प्रकार वास्को पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात गोव्याबाहेरील लोकांना प्रवेश निषिद्ध असतानाही मालवाहू रेल्वेतून वास्को पर्यंत आलेल्यांना आश्रय दिल्याच्या कारणावरून खलिल इराणी यांना निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या