काणकोणात पावसाची हजेरी

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

काणकोणच्या काही भागात वायंगण शेतीची कापणी करून पिके शेतातच असल्याने शेतकरी चिंतातूर झाले.

काणकोण

काणकोणच्या वेगवेगळ्या भागात आज(ता.२०) संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. काणकोणच्या काही भागात आज संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरूवात झाली रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती.कोविड-१९ मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे घराच्या शाकारणीचे काम झाले नाही. त्यामुळे नागरीकाची धांवपळ उडाली. काणकोणच्या काही भागात वायंगण शेतीची कापणी करून पिके शेतातच असल्याने शेतकरी चिंतातूर झाले. काहीचे भात खळावरच होते ते भातही अवकाळी पावसाने काही प्रमाणात भिजले.आज वातावरणात उष्मा वाढला होता अवकाळी पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा आला.

 

संबंधित बातम्या