राज्‍यात पावसाची शक्‍यता, शिवाय थंडीही वाढली

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

पणजी, 
गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून राज्‍यातील तापमान कमी झाले असून रविवारी दिवसभरात १८.४ अंश सेल्‍सिअस तापमानाची नोंद झाली. गोवा वेधशाळेने दिलेल्‍या माहितीनुसार, ७ ते ९ जानेवारी या कालावधीत राज्‍यात पावसाच्‍या हलक्‍याशा सरी कोसळण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍याच्‍या तापमानापेक्षा पारा आणखी खालावणार असून थंडी वाढण्‍याचीही शक्‍यता आहे. 

गेल्‍या चार दिवसांपुर्वी राज्‍यात कमीत कमी २१ अंश सेल्‍सिअस तापमानाची नोंद झाली होती. चार दिवसात तापमानही कमी झाले असून यापेक्षा तापमान कमी होणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. हिवाळ्यात पावसाच्‍या आगमनाची शक्‍यता वर्तविणे हापण एक हवामान बदलाचा पीपणाम आहे. हिवाळ्यातही पाउस थांबण्‍यास तयार नाही. मासेमार्‍यांना वेधशाळेकडून कोणत्‍याच प्रकारची सुम्रदात न उतरण्‍याविषयीची सूचना देण्‍यात आलेली नाही. पुढील पाच दिवस राज्‍यातील वातावरण कोरड्या स्‍वरूपाचे असणार आहे. गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात धुके पडण्‍यास सुरवात झाली असून सकाळी धुक्‍याची झालर पसरत आहे. पणजी, मडगाव, वास्‍को यासारख्‍या महत्त्‍वाच्‍या शहरात काम करणारे लोक सकाळी गाडीवरून प्रवास करताना स्‍वेटर, जॅकेट यासारख्‍या गोष्‍टींचा आधार घेतला जाताना सर्रास दिसून येत आहे. बाजारातही थंडीसाठी वापरण्‍यात येणारे कपडे दाखल झाले आहेत. 

संबंधित बातम्या