कुडचडेत बाजाराचे पुन्हा स्थलांतर

Re-migration of market place's in kudachade
Re-migration of market place's in kudachade

कुडचडेः कुडचडे बाजारात रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण होत होती, यावर तोडगा म्हणून पालिकेने आठवडा बाजाराचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यापूर्वी जुन्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना सुडा मार्केटमध्ये हलविले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून इतर व्यापाऱ्यावर परिणाम जाणवू लागला. त्यात खाण व्यवसाय ठप्प झाल्याने ग्राहक मिळणे कठीण झाले होते.

या पार्श्‍वभूमीवर व्यापारी संघटनेने परत आठवडी बाजार पूर्वीच्या जागी आणण्यासाठी पालिकेकडे मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून तात्पुरता तोडगा काढण्यात आला. यात प्रामुख्याने विक्रेते रस्त्यावर न बसता दुकानांसमोरील उघड्या जागेवर बसावे. त्याच्यात काही भांडण-तंटा उद्‌भवल्यास पालिका जबाबदारी घेणार नसून व्यापारी संघटनेने घ्यावी, हा पर्यायी प्रयोग एक महिन्यासाठी आहे. याला बैठकीत मान्यता देण्यात आली.

कुडचडे पालिकेत बोलावलेल्या या बैठकीला मार्केट असोसिएशनचे सदस्य तसेच आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल, पालिका मुख्याधिकारी अजय गावडे, नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, उपनगराध्यक्ष पिएदाद दिनिज व अन्य नगरसेवक हजर होते. सदर बैठकीत मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रोशा परेरा यांनी काही प्रश्‍न मांडले व त्यावर बरीच चर्चा झाली. शेवटी मार्केट असोसिएशनने जबाबदारी घेण्याच्या अटीवर निर्णय घेण्यात आला.

पालिकेची जुनी व्यापारी इमारत मोडकळीस आल्यामुळे सदर परिसरात कोणत्याच विक्रेत्यांना बसू दिले जाणार नाही. त्याचबरोबर दुकानासमोर एक मीटरच्या आत बसण्यास मुभा दिलेल्या कोणत्याही विक्रेत्याने पदपथावर बसण्याचा किंवा एक मीटरच्या बाहेर बसण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हटविण्यात येईल. तसेच मार्केट असोसिएशनने बाजाराच्या बाजूला असलेल्या एका खासगी जागेत काही भाजी विक्रेत्यांना बसू द्यावे असा प्रस्ताव मांडला होता. सदर जागेच्या मालकाकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतरच पालिका सदर प्रस्तावाच्या बाबतीत पूर्ण सहकार्य करेल, असे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

पार्किंगचा प्रश्न सुटेल
कुडचडेतील जनतेची प्रत्येक अडचण सोडविण्याचा आमदार या नात्याने आपण प्रयत्न करत आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्केट असोसिएशनला जबाबदारी घेण्यास सांगितले. कुडचडेत बऱ्याच काळापासून पार्किंगचा प्रश्‍न आहे. लवकरच हा प्रश्नही कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. बाजार परिसरातील रस्त्याचे हॉटमिक्‍स डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून सर्वत्र आखणी करून पे-पार्किंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com