त्‍या तोतयाकडून पैशे वसूल करून घ्‍या, कुतिन्‍हो

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

पणजी,
गोव्‍यामध्‍ये एक मंत्री उत्तरप्रदेशचा मंत्री बनून येतो आणि हा माणूस तोतया असतो. याची जराही माहिती न घेता या माणसाला सुरक्षा व्‍यवस्‍था दिली जाते, शिवाय त्‍याच्‍यावर खर्च केला जातो. आणि नंतर लक्षात येतेकी हा माणूस मंत्रीच काय साधा नगरसेवही नाही. गोवा सरकारने या माणसावर खर्च केलेला हा पैसा जनतेच्‍या खिशातील आहे. त्‍यामुळे या माणसाकडून हा सर्व पैसा वसूल करून घ्‍यावा अशी मागणी महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा प्रतिमा कुतिन्‍हो यांनी केली. 

या व्‍यक्‍तीचे नाव संजय कुमार सिंग असे असून सध्‍या हा व्‍यक्‍ती गोवा सरकारच्‍या ताब्‍यात आहे. पोलीस कोठही झाल्‍यानंतर तो उत्तरप्रदेशला परत गेल्‍यानंतर हे पैसे मिळणे शक्‍य नसल्‍याने लवकर हे पैसे मंजूर करून घ्‍यावेत. तसेच त्‍याच्‍यावर ४२० कलमांतर्गंत गुन्‍हा नोंद करावा. या व्‍यक्‍तीला काणकोण येथे कार्यक्रमाला नेले जाते, शिवाय तेथे हा माणूस मी गोव्‍यासाठी १० कोटी मंजूर करणार असल्‍याची घोषणा करतो. एक राज्‍यमंत्री दुसर्‍या राज्‍यासाठी दुसर्‍या राज्‍यासाठी पैसे वसुल करू शकत नसल्‍याचे माहिती असूनही आपल्‍या येथील सरकार झोपेतच राहिले होते. शिवाय क्रीडा खात्‍यात मनोहर पर्रीकर यांचा आपण भाचा असल्‍याचे सांगत किट नेण्‍यात आले, या प्रकरणाबाबतही चौकशी करण्‍यात यावी, असे कुतिन्‍हो म्‍हणाल्‍या. 
विधानसभेतील अधिवेशनात म्‍हादई नदीबाबत काँग्रेसच्‍या प्रतिनिधींनी कडाडूक विरोध केला. यामध्‍ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आणि प्रतापसिंह राणे अग्रणी होते, त्‍यामुळे त्‍यांचेही आम्‍ही अभिनंदन करीत असल्‍याचे कुतिन्‍हो म्‍हणाल्‍या. 

संबंधित बातम्या