क्षेत्रीय प्रचार कार्यालयाकडून कोविड-19 विषयी जनजागृती मोहीम

Dainik Gomantak
शनिवार, 11 एप्रिल 2020

कोविड-19 विषयी जनजागृती मोहीमेचा भाग म्हणून महाराष्ट्र आणि गोवा प्रादेशिक संपर्क कार्यालयाच्या गोवा विभागाने शनिवारपासून जनजागृती मोहीम सुरु केली.

पणजी, 

कोविड-19 विषयी जनजागृती मोहीमेचा भाग म्हणून महाराष्ट्र आणि गोवा प्रादेशिक संपर्क कार्यालयाच्या गोवा विभागाने शनिवारपासून जनजागृती मोहीम सुरु केली. 14 एप्रिलपर्यंत राज्यभर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यात ध्वनीसंदेश, बॅनर्सच्या माध्यमातून संदेश दिला जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरी भागात संदेशवाहन फिरणार आहे. प्रादेशिक संपर्क कार्यालयाचे संचालक संतोष अजमेरा याविषयी माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. तसेच गोव्यातही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशातील लॉकडाऊन संदर्भातील निर्णयानूसार या अभियानाची आगामी दिशा स्पष्ट केली जाईल. जनतेने फक्त सरकारी सूचना आणि निर्देशांचे पालन करावे. समाजमाध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अजमेरा म्हणाले. 

संबंधित बातम्या