किमान शिलकीची गरज नाही; स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून बचत खातेधारकांना दिलासा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी बचत खात्यावर दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची अट शिथिल केली आहे. तसेच, बॅंकेने ग्राहकांसाठी "एसएमएस'चे शुल्कही माफ केले आहे.

देशभरातील बॅंकेच्या सर्व 44.51 कोटी बचत खात्यांसाठी बॅंकेने ही घोषणा केली आहे. बॅंकेच्या बचत खातेधारकांना महानगर, निमशहरी आणि ग्रामीण भागात दर महिन्याला अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि एक हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये ठेवावी लागते. खातेधारकांनी दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम बचत खात्यात न ठेवल्यास बॅंकेकडून 5 ते 15 रुपये अधिक कर असा दंड आकारला जातो.

बचत खात्यावरील व्याजदरात कपात
बॅंकेने सर्व बचत खात्यांसाठी वार्षिक 3 टक्के व्याजदर दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता स्टेट बॅंक ऑफ इंडिया देशातील सर्वांत मोठी व्यावसायिक बॅंक आहे. बॅंकेत 31 डिसेंबर 2019 अखेर 31 लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून, बॅंकेच्या देशभरात 21 हजार 959 शाखा आहेत.
 
संबंधित बातम्या