आगारवाडा पंचायत क्षेत्रातील बेकायदा फलक हटवले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मोरजी:आगारवाडा पंचायत क्षेत्रातील बेकायदा फलक हटवले
उदंड जाहले रस्त्यांच्या बाजूला फलक ही स्थिती सर्व तालुक्यातील पंचायत क्षेत्रात आहे.रस्त्याच्या बाजूला, जंक्शनवर, सार्वजनिक ठिकाणी हे फलक लावलेले दिसतात.या फलकांवर कारवाई कुणी करावी असा गंभीर प्रश्न समोर असतानाच आगारवाडा पंचायतीने मात्र आपल्या क्षेत्रातील सर्व बेकायदा फलकावर कारवाई करताना ते फलक काढून टाकले.

या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गावातील व गावाबाहेरील कार्यक्रम प्रसिद्धीचे फलक लावून परिसरात फलकांचा मारा केला जात होता.आगारवाडा सरपंच प्रमोद आगरवाडेकर यांच्या अध्यक्षयतेखाली बेकायदा फलकावर कारवाई करण्यात आली. यावेळी सरपंच प्रमोद आगरवाडेकर यांनी सांगितले की, पंचायत क्षेत्रात जे फलक लावले होते त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी संबंधितांनी घेतली नव्हती.या पुढे जर फलक लावला तर आणि ते सापडले तर त्यांच्यावर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला.

कित्येक वर्षांपासून वास्को विकासापासून वंचित

संबंधित बातम्या