आरक्षण जाहीर न झाल्याने तयारीसाठी विलंब

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

दीपक ढवळीकर : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आम्ही तयार.

ढवळीकर म्हणाले,पक्षाच्या आजच्या राष्ट्रीय समिती आणि कार्यकारिणच्या झालेल्या बैठकीत पक्ष जिल्हा पंचायत निवडणुका लढविण्यावर चर्चा झाली.

पणजी: निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर दीड महिना अगोदर आरक्षण जाहीर होणे आवश्‍यक असते.परंतु राज्य सरकार त्यात वेळकाढूपणा करीत असल्याने आम्हाला निवडणुकीची तयारी करण्यास विलंब होत आहे. आम्ही जिल्हा पंचायती निवडणुका लढविणार असल्याने उमेदवार निवडीसाठी आरक्षण हे महत्त्वाचे आहे.राज्य सरकार आपल्याला हवी तसे वातावरण करण्यास प्रयत्न करीत असल्याची टीका मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

जिल्हा पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी मार्च महिन्याच्या मध्याला निवडणुका होतील, असे दिसते. त्यामुळे सरकारकडून आरक्षण जाहीर होणे अपेक्षित होते.दीड महिना अगोदर आरक्षण जाहीर करणे गरजेचे असून, राज्य सरकार वेळ काढीत आहे. या निवडणुका लढविण्यास प्रत्येक पक्षाला संधी द्यावी, जर भाजप सरकार स्वार्थासाठी आरक्षण जाहीर करण्यास विलंब करीत असेल तर गोव्यातील जनता त्यांना नक्कीच धडा शिकवतील.

ते पुढे म्हणाले की, जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी आम्ही उमेदवार देण्यासाठी तयार आहोत. आजच्या बैठकीत आम्ही जिल्हा पंचायतीच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसारच आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु आरक्षण जाहीर होण्यास होत असलेला उशीर पाहता सरकारची नक्की भूमिका समजून येत नाही.

तुये इलेक्‍ट्रॉनिक सिटी वर्षभरात पूर्णत्त्‍वास​

पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करणार!
मगो पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार पक्षाची घटनेत काही बदल करण्यात येणार आहेत. घटनेत करण्यात येणाऱ्या बदलासाठी पक्षाने पाच जणांची समिती निवडलेली आहे. त्या समितीत ॲड. नारायण सावंत, ॲड. सत्यवान पालकर, रत्नाकर म्हार्दोळकर, अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि कार्यकारी अध्यक्ष नरेश सावळ यांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

संबंधित बातम्या