बॅंक ऑफ बडोदाचा परवाना रिझर्व्ह बॅंक रद्द करू शकते.

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

कोलकता उच्च न्यायालयाने केली सूचना

कोलकता : बॅंक ऑफ बडोदाचा परवाना रद्द करण्यासाठी पावले उचलण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने विचार करावा, अशी सूचना कोलकता उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेला केली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडविरुद्ध बॅंक ऑफ बडोदा या खटल्यात उच्च न्यायालयाने हे मत नोंदवले आहे. बॅंक ऑफ बडोदा जर तिसऱ्या पक्षाने दिलेली बॅंक हमी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडला देऊ शकत नसेल, तर बॅंकेचा परवाना रद्द करण्यासंदर्भात विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश संजीव बॅनर्जी आणि कौशिक चंदा यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने रिझर्व्ह बॅंकेला या प्रकरणात योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले. बॅंक ऑफ बडोदा बॅंक हमी देत नसेल तर बॅंकेचा परवाना किंवा बॅंकिंग व्यवसाय करण्याचा अधिकार काढून घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडला सिम्ल्पेक्‍स प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेड या कंपनीने दिलेली 6.97 कोटी रुपयांच्या बॅंक हमीचे रुपांतर बॅंक ऑफ बडोदाने रोखीत न केल्याने हा खटला दाखल आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेला हे निर्देश दिले आहेत.

 

 

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मिडिया, वितरण व्यवसायाचे नेटवर्क 18 मध्ये एकत्रीकरण

संबंधित बातम्या