काणकोणातील केरीत ग्रामस्थ परतू लागले

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

डोंगराच्या उच्च शिखरावर असलेल्या या वाड्यावर रस्ता नाही,वीजेची सोय नाही लहान मुलासाठी अंगणवाडी नाही.डोंगराळ भाग असल्याने शेतीसाठी आवश्यक सपाट जमिनिचा अभाव यामुळे येथील रहिवासी आपली उपजीविका चालवण्यासाठी गाव सोडून काणकोण तालुक्यातील वेगवेगळ्या भागात राहून उपजिविका करीत होते.

 

 सुभाष महाले

काणकोण

काणकोणचे माथेरान केरी  या खोतीगावातील  सर्वच रहिवासी गावात परतले आहेत.हा भाग दुर्गम असल्याने या भागातील युवा पिढी आपल्या बायका मुलासह ज्या भागात काय मिळेल त्या भागात राहत होते.बहुतेक येथील युवक पर्यटन व्यावसायिकांकडे  रोजंदारीवर काम करत होते.या डोंगराच्या उच्च शिखरावर असलेल्या या वाड्यावर रस्ता नाही,वीजेची सोय नाही लहान मुलासाठी अंगणवाडी नाही.डोंगराळ भाग असल्याने शेतीसाठी आवश्यक सपाट जमिनिचा अभाव यामुळे येथील रहिवासी आपली उपजीविका चालवण्यासाठी गाव सोडून काणकोण तालुक्यातील वेगवेगळ्या भागात राहून उपजिविका करीत होते. वाड्यावर फक्त वयोवृद्ध राहत होते.लॉकडाऊन मुळे येथील रहिवाश्याची पावले पुन्हा घराकडे वळली आहेत.अकरा घराची वस्ती या वाड्यावर असून सुमारे शंभर लोक या वाड्यावर आहेत. या वाड्याला जवळचा खोतीगावातील वाडा म्हणजे नडके या वाड्यापासून  एक तास पायपीट करून डोंगर चढून केरी वाड्यावर जावे लागते. त्यांना जवळचा सांगे तालुक्यातील भाग म्हणजे साळजीणी ज्यावेळी या भागात खनिज व्यवसाय चालू होता त्यावेळी केरी वाड्यावरील सर्वच युवक खनिज व्यवसायात वेगवेगळी कामे करीत होते खनिज व्यवसाय बंद पडला आणि पोटासाठी या वाड्यावरील मनुष्यबळाची भ्रमंती सुरू झाली.या वाड्यावर शेतीसाठी पोषक जमिन नाही वाड्याच्या चारही बाजूला घनदाट अरण्य आणि हा वाडा खोतिगाव अभयारण्य कक्षेत येत असल्याने सतत वन अधीकाऱ्याचा ससेमिरा याला कंटाळून येथील युवा पिढीने पोट भरण्यासाठी स्थलांतर केले मात्र सणासुदीला ते देव कार्यासाठी गावात येत होते आता करोनाच्या पादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे येथील नागरीकाना मूळस्थानी यावे लागले आहे असे येथील एक युवक गणेश गावकर यांनी सांगितले. या वाड्यावर जाण्यासाठी काही ओहळ पार करावे लागतात पावसाळ्यात ते दुधडी भरून वाहत असल्याने ते ओलांडत्यासाठी रहिवाश्याना लाकडी पदपूल ऊभारावे लागतात.या ओहळावर किमान पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटचे पाईप घालावे. या वाड्याच्या पायथ्याशी असलेल्या नडके गावात भूमिगत वीज वाहिन्या घालून वीज पुरवठा करण्यात आला आहे.वीज खात्याने सामान पुरवल्यास श्रमदानाने भूमिगत वीज वाहिन्यासाठी चर खणण्याची तयारी गावकऱ्यानी दाखवली आहे मात्र वीज खाते केरी वासीयाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गणेश गावकर यांनी सांगितले.

 

 

संबंधित बातम्या