डोंगरी रिंगरोडच्या कामाला सुरवात स्‍थानिकांत समाधान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

वेल्हा:डोंगरी येथील इंत्रुज उत्सव शुक्रवार ता. १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असल्याने अत्यंत दयनीय स्थितीत असलेल्या डोंगरी येथील रिंगरोडचे डांबरीकरण पूर्ण व्हावे, अशी ग्रामस्‍थांची मागणी होती.यासंदर्भात वर्तमानपत्रात छायाचित्रासह वृतही प्रसिद्ध झाले होते.या वृत्ताची दखल घेऊन संबंधितांनी आज सकाळपासून कामाला सुरवात केली आहे.त्याबद्दल स्थानिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

थोरलेभाट येथील भागात भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता व केबल टाकण्याचे पूर्ण झाले नव्हते.केबल कमी पडल्याने कामात खंड पडला गेला, असे सांगण्यात आले.यामुळे रस्‍त्‍याची हळूहळू पार दुर्दशा बनत गेली.वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनाही हा रस्ता डोकेदुखी बनून राहिला आहे.या दरम्यान संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेला डोंगरीचा वार्षिक इंत्रुज उत्सव ता. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून बुधवार १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाला डोंगरीत प्रचंड गर्दी उसळते.यामुळे अत्यंत दयनीय स्थितीत असलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी स्थानिक लोकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती.
सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी येथील या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होईल, अशी माहिती आजोशी येथील एका कार्यक्रमात उपस्थितांना दिली होती.स्थानिक सरपंच प्रणीषा नाईक यांनीही या वृताला दुजोरा दिला.इंत्रुज उत्सव व सुसेत सायबिणीच्या फेस्‍तापूर्वी डांबरीकरण करावे, अशी लोकांची मागणी होती. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्‍यापूर्वी काम हाती घेण्‍यात आल्‍याने समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.

मिरामार किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य

संबंधित बातम्या