गोवाकॅनतर्फे राष्‍ट्रीय रस्‍ता सुरक्षा सप्‍ताह

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

पणजी, 
गोवाकॅन या सामाजिक संस्‍थेतर्फे एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे. युवकांमध्‍ये आणि इतरही गाडी चालविणार्‍यांमध्‍ये जनजागृती व्‍हावी म्‍हणून गोवा कॅनतर्फे 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह करण्‍यात आला आहे. या सप्ताहात युवकांच्या सुरक्षेवर भर देत त्‍यांच्‍यात जनजागृती करण्‍याचे काम करण्‍यात येणार आहे. 

गोवाकॅनतर्फे साजरा केला जाणारा हा 31वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह आहे. रस्त्‍यांवर होणार्‍या अपघातामुळे मोठया प्रमाणात  लोकांचा बळी जातो. या सप्ताहादरम्यान गोवा कॅनचे स्वयंसेवक हे ग्रामिण ग्राहक मंच आणि ग्राहक वेलफेर क्लब यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवतील. या सप्ताहात सहभागी होण्यासाठी गोवा कॅनतर्फे महाविद्यालये, नेहरू युवा केंद्र (एनवायके), युवा संघटनाच्या स्वयंसेवकांकडे संपर्क साधणार आहेत. 
पंचायती आणि नगरपालिका रस्ते सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समित्यांनी खड्डे व अपघात प्रवण क्षेत्रे पडताळणे, आयएसआय मार्क हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, रस्त्यावर सिग्नलची तपासणी, वेगाची मर्यादा निश्‍चित करणे यासारखे उपक्रम राबविण्यासाठी गोवाकॅन प्रयत्नशील असणार आहे. इंधन संवर्धनावर लक्ष केंद्रित करुन वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी व रस्ते अपघात कमी होईल यावर भर दिला जाईल.
गोवाकॅनतर्फे यासंदर्भात विविध बैठका घेण्‍यात येणार आहेत, तसेच स्मरणपत्रे सादर करतील तसेच गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाईला रस्ता अपघात पीडित योजनेसंदर्भात प्रकाश टाकतील.
 
संबंधित बातम्या