हल्याळ येथे रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात पार पडला

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

शिवप्रकाश देवराज म्‍हणाले की, आपले जीवन हे अनमोल आहे. त्‍याच्‍या रक्षण आपली जबाबदारी आहे. आजच्या युवा पिढीस मादक वस्तू, मोबाईलसह इतर वाईट सवयींपासून दूर ठेवल्यास जीवन आनंदाने जगू शकतो.

हल्याळ : सर्वांनी रस्ता सुरक्षिततेच्‍या नियमांचे पालन करणे आवश्‍‍यक आहे. १८ वर्षे पूर्ण होताच चालक परवाना आणि विमासह इतर कागदपत्र आपल्यासोबत ठेवून नियमांचे पालन करावे. यासाठी पोलिस विभागातर्फे ठोस पावले उचलून जागृतीचे कार्य करण्‍यात येत आहे.

याबरोबरच १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन चालविल्यास ३०४ कायदा अंतर्गत गुन्हा ठरतो. हे चुकविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलाच्या सुरक्षिततेच्या विषयी गंभीर विचार करावा, असे कारवार जिल्हा पोलिस वरिष्ठधिकारी शिवप्रकाश देवराज यांनी सांगितले. हल्याळ शहरातील हवगी येथील प्रथम दर्जा महाविद्यालयात पोलिस विभाग, एनएनएस कॅम्प आणि डिग्री कॉलेजमध्‍ये रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

आजच्या तंत्रज्ञान युगात मोबाईल आणि संगणकासारख्‍या आविष्कारचा दुरुपयोग करून सायबर क्राईम अपराधांना संधी मिळत आहे. जास्त प्रमाणात महिला सायबर क्राईमला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी जनतेने त्वरित जवळच्या ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे सांगितले.
कारवार जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे ३० हून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. युवकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. आपल्या देशात शेकडा १५ टक्के व्यसनामुळे अपघात होतात. युवकांनी व्यसनाकडे आकर्षित न होता अपघात टाळावेत.

सरकारच्या या धोरणाला ग्रामस्थांचा विरोध

या संदर्भात डीवायएसपी मोहनप्रसाद, पोलिस निरीक्षक बी. एस. लोकापूर, सायबर क्राईम पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, हल्याळ पोलिस उपनिरीक्षक यल्लालिंग कोण्णूर, प्राचार्य चंद्रशेखर लमाणी, डॉ. रेखा एम. आर., परमानंद दासार, म्हदेवाप्पा हांचीनमानी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या