खांडोळा येथे बंगला फोडला

 robbery
robbery

फोंडा:खिडकीचे गज कापून चोरट्यांकडून १३ लाखांचा ऐवज लंपास
तांबसुली - खांडोळा, माशेल येथे आज दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंगला फोडून रोख व दागिने मिळून एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व ही चोरी केली.

खांडोळा येथे विनायक नाईक यांच्या बंगल्यात ही चोरी झाली असून याप्रकरणी फोंडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या बंगल्यात विनायक नाईक तळमजल्यावर पत्नीसह, तर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा पुत्र वैभव नाईक व सून राहतात.आज सकाळी विनायक नाईक यांच्या पत्नी तसेच मुलगा व सून तिघेही कामाला गेल्यानंतर विनायक नाईक हे बाजारात गेले होते.दुपारी ते घरी परतल्यानंतर स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरट्यांनी तळमजला व पहिल्या मजल्यावरील दोन्ही कपाटे फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून एकूण तेरा लाखांचा ऐवज लंपास केला.

या चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी श्‍वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले, पण चोरट्यांचा काही सुगावा लागू शकला नाही.बंगल्यात बसवलेले सीसी टीव्ही कॅमेरे चोरट्यांनी आधीच निकामी केल्याने त्यांचा माग लागू शकला नाही.

चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांनी या बंगल्याची पाहणी केली असावी तसेच सीसी टीव्ही कॅमेरेही निकामी करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने हे चोरटे सराईत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com