चिंबल येथे जिलेटीनद्वारे खडक फोडण्याचे प्रकार  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:चिंबल भागात जिलेटनचा वापर करून स्फोट घडविण्याचे प्रकार
प्रदेश युथ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिंबल येथील भागात खडक फोडण्यासाठी जिलेटनचा वापर करून स्फोट घडवले जात असल्याने तेथे राहत असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.या स्फोटामुळे हादरे बसत असल्याने त्यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या बेकायदेशीरपणे स्फोट घडवून आणलेल्या प्रकरणांना बंदी घालण्याचे निवेदन आज प्रदेश यूथ काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

चिंबल येथे खडीक्रशरसाठी जिलेटनचा वापर करून स्फोट घडविल्याने त्याचा धूळ जवळच वस्ती असलेल्या घरांमध्ये येत आहे.तेथील काही घरांना या स्फोटामुळे तडेही गेले आहेत.या स्फोटामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे चिंबलवासियांचे जीवन विस्कळीत झाले आहे.त्यांना जीव मुठीत घेऊन घरांमध्ये राहावे लागत आहे.यापूर्वीही काही वर्षापूर्वी हे प्रकार सुरू करण्यात आले होते तेव्हा त्याची तक्रार दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केले होते.पुन्हा त्याच भागात खडीक्रशरसाठी खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर करण्याचे
प्रकार सुरू आहेत.चिंबल पंचायतीने कोणताच या खडीक्रशरसाठी दिलेला नाही.त्यामुळे यासंदर्भात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.हे निवेदन देताना चिंबलवासीय उपस्थित होते.
चिंबल परिसरात खडक फोडण्यासाठी स्फोट घडवून आणले जात असल्याची चौकशी त्वरित करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी दिल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी दिली.यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश यूथ काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच सांताक्रुझ मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

किनाऱ्यावर कासव संवर्धनाला वेग

Tags

संबंधित बातम्या