खोट्या आरोपांद्वारे दबावाचे जुनेच डावपेच भाजपच्या आरोपावर खंवटेंची प्रतिक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

रोहन खंवटे यांची प्रतिक्रिया

विधानसभेत बोलताना सरकारच्या अपयशाच्या मर्मावर बोट ठेवल्याने असे खोटे आरोप मुख्यमंत्र्यांनीच भाजपला करण्यास सांगितले असावेत, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.

पणजी : भाजप सरकारच्या अपयशाविरोधात आवाज उठविल्यानंतर आरोप करून दबाव आणण्याचे भाजपचे हे जुनेच डावपेच आहेत. भाजपच्या या अपरिपक्वता असलेल्या नेत्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही.

भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या बोगस आरोपावरून भाजप नेते राजकारणात किती अपरिपक्व आहेत हे दिसून येते. भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना असे आरोप करण्यास पुढे केले आहे. आर्थिक अडचणीबरोबर हे बुद्धिवंत नेतेही वैफल्यग्रस्त झाले आहेत असे दिसून येते. विधानसभेतील भाजपचे आमदार विरोधकांसमोर अपयशी ठरले आहेच त्याशिवाय सभागृहाबाहेर ते त्यांच्या माणसांना हाताळण्यातही अपयशी ठरले आहेत.

अर्थसंकल्पाच्या तोंडावर विरोधकांवर आरोप करून त्यांना त्यात व्यस्त ठेवणे हा त्यामागील हा भाजपचा हेतू असू शकतो, असे अपक्ष आमदार खंवटे म्हणाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्‍पाबाबत बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या